BRICS मध्ये पहलगाम हल्ल्याची निंदा; मोदी म्हणाले, हल्ला मानवतेवर जखम…

रियो डी जनोरिया- ब्राझीलमध्ये रविवारी झालेल्या 17 व्या ब्रिक्स संमेलनात सदस्य देशांनी ३१ पानी आणि १२६ मुद्दे असलेला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

रियो डी जनोरिया- ब्राझीलमध्ये रविवारी झालेल्या 17 व्या ब्रिक्स संमेलनात सदस्य देशांनी ३१ पानी आणि १२६ मुद्दे असलेला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि इराणवर झालेल्या इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

यापूर्वी 1 जुलैला भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सशी संबंधित देशांवर 10 टक्के जादा टेरिफ आकरण्याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स संमेलनात पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. पहलगाम दहशतवादी हल्ला हा केवळ भारतावर झालेला नसून, यामुळं मानवतेवर दखल झाल्याचं मोदी म्हणाले. दहशतवादाचा निषेध हा आपला सिद्धांत असायला हवा, सुविधा नसावी असंही मोदी म्हणालेत. यासोबतच एक नव्या विश्व व्यवस्थेची मागणीही मोदी यांनी केली.

२० व्या शतकात निर्माण झालेल्या वैश्विक संस्था २१ व्या शतकातील आव्हांनावर मात करण्यात करण्यात नाकाम ठरल्याचं मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. सध्याच्या एआयच्या जमान्यात तंत्रज्ञान प्रत्येक आठवड्याला अपडेट होतय, मात्र एक वैश्विक संस्थान मात्र ८० वर्षांनंतरही अपडेट होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. २० व्या शतकातील टाईपरायटरनं २१ व्या शतकातील सॉफ्टवेअर चालवता येणार नसल्याचं मोदींनी म्हटलंय.

ट्रम्प यांची काय धमकी?

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सशी संबंधित सदस्य राष्ट्रांना धमकी दिली आहे. अमेरिका विरोधी असलेल्या ब्रिक्सच्या धोरणांशी जो देश जोडून घेईल त्यांच्यावर अतिरिक्त १० टक्के टेरिफ लावण्यात येईल, यातून कुणालाही सूट मिळणार नाही, असं ट्रम्प यांनी लिहिलंय.

ब्रिक्सच्या जाहीरनाम्यात विश्व व्यापार संघटनेच्या नियमांविरोधात वाढत्या टेरिफवर चिंता व्यक्त करण्यात आलीय. वाढता टेरिफ हा विश्व व्यापार आणि पुरवठा शृंखलेला धोका असल्याचंही जाहीरनाम्यात म्हटलय. मात्र यात अमेरिकेच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

ब्रिक्सनं वैश्विक सुशासन सुधारावं, चीनची अपेक्षा

ब्रिक्स देशांनी वैश्विक सुशासनात सुधारणा घडवून आणावी, असं आवाहन चीनच्या वतीनं करण्यात आलंय. चिनी पंतप्रधान ली क्यांग यांनी ब्रिक्स संमलेनात भूमिका स्पष्ट केली. चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी सुशासन आणण्यासाठी ब्रिक्सनं महत्त्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन चीननं केलंय. ब्रिक्सच्या सदस्य देशांसोबत चीन न्यापूर्ण प्रभावी व्यवहार करेल असं आश्वासनही देण्यात आलंय


About Author

Smita Gangurde

Other Latest News