बर्मिंगहम– बर्मिगहॅम टेस्टमध्ये टीम इंडियानं नवा इतिहास घडवला. तब्बल 58 वर्षांनी पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये टीम इंडियानं यजमान इंग्लंडच्या संघाचा तब्बल 336 धावांनी धुव्वा उडवला. टेस्टच्या इतिहासातील इंग्लंडविरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा देदिप्यमान विजय ठरलाय. या विजयासह भारतानं 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय
आणि या नेत्रदीपक विजयाचा शिल्पकार ठरलाय. शुभमन गिल. पहिल्या डाव्यात द्विशतकासह 269 धावा आणि दुसऱ्या डावात 161 धावांची तडाखेबाज खेळी केली. दोन डावांत मिळून त्यानं एकूण 430 धावांची लयलूट केली

शुभमन टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय
शुभमननं पहिल्या इनिंगमध्ये 269 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 161 रन्स केले. एका टेस्टमध्ये 430 रन्स करणारा भारतीय क्रिकेटर तो ठरलाय. कोणत्याही भारतीय क्रिकेटपेक्षा हा स्कोअर सर्वाधिक आहे. 2017 साली विराट कोहलीनं श्रीलंकेच्या विरोधात 2017 साली 293 रन्स केले होते, तोही रेकॉर्ड शुभमन गिलनं मोडलाय. यासोबतच इंग्लंडमध्ये सर्वाधिक सिक्सर मानणारा क्रिकेटर अशीही ओळख शुभमननं निर्माण केलीय. या टेस्टमध्ये त्यानं 11 सिक्स मारलेत. त्यातील 3 पहिल्या इनिंगमध्ये तर उर्वरित 8 त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये मारले.
शुभमनची दिग्गजांशी बरोबरी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 2004 मध्ये सिडनीच्या मैदानावर 241 धावांची खेळी केली होती
राहुल द्रविडनं अॅडलेडच्या मैदानात 233 धावा फटकावल्या होत्या. सुनील गावस्करांनी 1979 मध्ये ओव्हलच्या मैदानावर 221 धावा कुटल्या होत्याया सगळ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंना मागे टाकत शुभमननं नवा विक्रम केला
शुभमनकडून अपेक्षा उंचावल्या
टेस्ट इंडियाचा कॅप्टन म्हणून शुभमन गिलचा हा पहिलाच विजय. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांनी टेस्टला अलविदा केल्यानंतरचा हा पहिलाच दैदिप्यमान विजय त्याच्या नावावर झालाय. गिलच्या नेतृत्वात संघानं फक्त सामना जिंकला नाही, तर ऐतिहासिक विक्रम नोंदवला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेलाय. या विजयानं भारतीय संघाचा आत्मविश्वास तर वाढला आहेच, शिवाय चाहत्यांच्या अपेक्षाही उंचावल्यात.कॅप्टन गिल, मोहम्मद सिराज, आकाश दीप यांच्यासारखे नवे स्टार्स भारतीय टीमच्या अवकाशात झळाळू लागलेत. आता या नव्या टीमकडून वर्ल्डकपच्या आशा क्रिकेट चाहत्यांना आहेत.