वयाच्या 80 व्या वर्षी आजीचं 10 हजार फूट उंचावरुन स्काय डायव्हिंग, श्रद्धा चौहान यांचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

10 हजार फूट उंचावरुन विमानातून उडी मारणं तसं सोपं नाही. मात्र श्रद्धा चौहान यांनी हे जिद्दीनं करुन दाखवलं.

नरनौल, हरयाणा – वयाच्या ८० व्या वाढदिवशी हरियाणातल्या एका आजीनं १० हजार फूट उंचावरुन स्काय डायव्हिंग केलंय. निवृत्त प्राध्यापक डॉ. श्रद्धा चौहान यांच्या या डेअरिंगच्या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. त्यांच्या निवृत्त लष्करी अधिकारी मुलानं आईची ही इच्छा पूर्ण केलीय.

विमानाची आकाशातील उंची 10 हजार फूट, विमानाचा ताशी वेग 260 किलोमीटर प्रतितास , स्काय डायव्हिंग करणाऱ्या आजीचं वय 80 वर्ष, स्वप्नातही अशक्य वाटणारी ही बाब प्रत्यक्षात घडलीय. निवृत्त प्राध्यापक असलेल्या डॉ. श्रद्धा चौहान यांची स्काय डायव्हिंगची इच्छा वयाच्या 80 व्या वाढदिवशी अशी पूर्ण झालीय.

सैन्यदलाच्या माजी अधिकाऱ्यानं आईची इच्छा केली पूर्ण

हरयाणात असलेल्या देशातील एकमेव स्काय डायव्हिंग स्कूलमध्ये ही इच्छा पूर्ण करण्यात आली. 80 व्या वाढदिवशी आईची ही इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या मुलानं महत्त्वाची भूमिका बजावली.

सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सौरभ सिंह शेखावत यांनी आईची इच्छा पूर्ण केली. सौरभ सिंह सध्या नारनौल स्काय डायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षकपदावर कार्यरत आहेत.
वर्षभरापूर्वी स्काय डायव्हिंग करण्याची इच्छा त्यांच्या आईनं व्यक्त केली होती. ती इच्छा मुलानं पूर्ण केलीय.
10 हजार फूट इंचीवरुन न घाबरता स्काय डायव्हिंग केलेल्य़ा या 80 वर्षीय आजीचं कौतुक आता सोशल मीडियावर होतंय.

स्काय डायव्हिंगवाल्या आजींची ओळख

१. डॉ. श्रद्धा चौहान या मूळच्या राजस्थानच्या
२. कोटपुतली बरहोड जिल्ह्यात दौलत सिंह की ढौणी गावातील रहिवासी
३. जोधपूरमध्ये श्रद्धा चौहान होत्या संस्कृतच्या प्राध्यापक
४. निवृत्तीनंतर गावात सरपंचपदही भूषवलं
५. मुलगा सौरभ सिंह शेखावत निवृत्त लष्करी अधिकारी
६. स्पोंडेलिसिस आणि स्पायनल डिस्कचा त्रास असतानाही केलं साहस

सोशल मीडियावर आजीचं कौतुक

10 हजार फूट उंचावरुन विमानातून उडी मारणं तसं सोपं नाही. मात्र श्रद्धा चौहान यांनी हे जिद्दीनं करुन दाखवलं. स्काय डायव्हिंग करण्यापूर्वी त्याचं प्रशिक्षणही श्रद्धा चौहान यांना देण्यात आलं होतं. 260 किमी वेगानं आकाशातून खाली येताना श्रद्धा चौहान अजिबात घाबरल्या नाहीत. सहजतेनं त्यांनी हे लक्ष्य पूर्ण केलं. आता सोशल मीडियावर त्यांच्या या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. वयाच्या 80 व्या वर्षी श्रद्धा चौहान यांनी केलेल्या या दिव्यानं अनेकांना प्रेरणा मिळालीय, हे नक्की


About Author

Smita Gangurde

Other Latest News