पहिल्यांदा आयटीआयर भरताना घ्या विशेष काळजी; नाहीतर बसेल दंड!

तुम्ही पहिल्यांदाच रिटर्न भरण्याची तयारी करत असाल तर काही काळजी घेणे आवश्यक आहे.

लाखो करदाते पहिल्यांदाच आयकर रिटर्न भरतील. अशा स्थितीत, तुम्हीपण यापैकी असाल तर थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण एका छोट्याशा चुकीमुळे फक्त तुमचा परतावा अडकणार नाही तर मोठा दंडही बसू शकतो, विशेषतः अशी एक चूक आहे ज्यामुळे तुम्हाला 1.5 लाखांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. नेमके याचे काय नियम आहेत, ते समजून घेऊ…

आयकर रिटर्न भरताना घ्या काळजी

आयकर विभागाने वेगवेगळ्या चुकांसाठी वेगवेगळे दंड निश्चित केले आहेत. तुम्ही व्यावसायिक किंवा फ्रीलांसर असाल आणि तुम्ही वेळेवर खाते सांभाळले नसेल किंवा ऑडिट अहवाल दाखल केला नसेल, तर तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. आयकर कायद्याच्या कलम 271A आणि 271B अंतर्गत हा दंड आकारला जातो. त्यामुळे हे नियम विशेषत्वाने समजून घेणे गरजेचे आहे.

सीएची मदत घ्या; धोका टाळा! 

यंदा पहिल्यांदा ITR दाखल करत असाल तर चार्टर्ड अकाउंटंट किंवा कर तज्ञाची मदत घ्या. तसेच उत्पन्नाचे सर्व स्रोत नोंदवले आहेत, सर्व आवश्यक कागदपत्रे तयार आहेत आणि फॉर्म काळजीपूर्वक भरायची खात्री करा. यावेळी आयकर विवरणपत्र दाखल करायला आयकर विभागाने 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

आयकर रिटर्न भरताना सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ची मदत घेणे अत्यंत उपयुक्त ठरते. अनेकजण स्वतःहून रिटर्न भरताना चुका करतात, ज्यामुळे नंतर नोटीस, दंड किंवा चौकशीची शक्यता वाढते. सीए तुमच्या उत्पन्नाचे विश्लेषण करून योग्य कर नियोजन करतो, टॅक्स सेव्हिंग पर्याय सुचवतो आणि कायदेशीर अडचणींपासून दूर ठेवतो. विविध कलमांखाली सूट मिळवण्यासाठी तसेच गुंतवणुकीचे योग्य दस्तऐवज सादर करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन गरजेचे असते.

विशेषतः फ्रीलान्सर, व्यावसायिक, कंपन्यांचे भागीदार यांच्यासाठी रिटर्न भरताना बारकाईने काम करणे गरजेचे असते. त्यामुळे चुकीचा सल्ला टाळा आणि अनुभवी सीएची मदत घेऊनच रिटर्न भरा – सुरक्षिततेसाठी हा एक शहाणा निर्णय आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News