पुरी- ओडिशात जगन्नाथ पुरीतील रथयात्रेत रविवारचा दिवस गाजला तो सुवर्ण पोषाखानं. भगवान जग्गनाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना तब्बल २०८ किलोंच्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं होतं. सोन्याच्या हातापायासंह चांदी, हिरे मोती अशा दागिन्यांचा यात समावेश होता.
जगन्नाथ पुरीतील रथयात्रा हा मोठा उत्सव असतो. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या रथयात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी जगन्नाथपुरीत झालीय. रविवारी भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि सुभद्रा यांवा सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं. या सोहळ्याला स्वर्ण भेष म्हणजे सोन्याचा पोषाख असं संबोधलं जातं.

208 किलोंचे सोन्याचे दागिने
भगवान जगन्नाथाच्या खजिन्यात असलेलं सोनं, हिरे, माणकं, चांदी यांचे दागिने या तिन्ही देवतांना चढवण्यात येतात. तब्बल 208 किलोंचे सोन्याचे दागिने यावेळी या मूर्तींवर चढवले जातात. मूर्तींचे हात पायही सोन्यानं तयारे केलेले आहेत, तेही मूर्तींना परिधान केले जातात.
काय आहे स्वर्ण भेष अनुष्टान?
१. 1460 साली राजा कपिलेंद्र देव याच्या कार्यकाळात स्वर्ण भेष अनुष्टानाला सुरुवात
2. दक्षिण भारतातील राजांविरोधात युद्ध जिंकून राजा राजा परतला
३. सोन्यानं भरलेल्या 16 गाड्या घेऊन कपिलेंद्र राजा ओडिशात
४. विजयानंतर भगवान जगन्नाथ आणि इतर देवतांच्या मूर्तींना सोन्याची आभूषणे घालण्याची परंपरा
जगन्नाथाचं रत्नभांडार
2024 साली 46 वर्षानंतंर भगवान जगन्नाथाचं रत्न भांडार उघडण्यात आलं होतं. त्यावेळी जगन्नाथाकडे असलेली अफाट संपत्ती पहिल्यांदा समोर आली होती.
१. चार धामातील एक असलेल्या जगन्नाथ मंदिराची निर्मिती 12व्या शतकात
२. मंदिरातील रत्नभांडारात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेचे दागिने
३. 1978 साली 70 दिवस दागिन्यांच्या मोजदादीचं काम
४. आतल्या आणि बाहेरच्या रत्नभांडारातील सोने, चांदी, हिरे, माणकांची मोजदाद
५. त्यानंतर 1985 साली रत्नभांडार उघडण्यात आलं
६. 128 किलो सोनं आणि 221 किलो चांदीची मोजदाद
६. 1985 नंतर रत्नभांडाराची किल्ली गायब, 46 वर्षांनंतर 2024 साली पुन्हा दागिन्यांची मोजदाद
जगन्नाथाची संपत्ती किती?
2024 साली झालेल्या मोजदादीत भगवान जगन्नाथांकडे प्रचंड संपत्ती असल्याचं समोर आलंय.
1. सोने, चांदी, हिरे , मौल्यवान दागिने 150 कोटी
2. जगन्नाथ मंदिराच्या नावे 30 हजार एकर जमीन
3. ओडिशाचा राजा अंगनभीम देवकडून 2.5 लाख माधा सोन्याचं दान
4. बाहेरच्या भांडारात सोन्याचे मुकुट आणि प्रत्येकी 120 तोळ्यांचे तीन सोन्याचे हार
5. जगन्नाथ आणि बलभद्रासाठी सोन्याचे हात आणि पाय
6. आतल्या रत्नभांडारात 74 सोन्यांचे दागिने, प्रत्येकाचं वजन 100 तोळ्यांपेक्षा जास्त
7. सोने, हिरे, माणकांसारखी मैल्यवान संपत्तीही भांडारात
8. 140 पेक्षा जास्त चांदीच्या आभूषणांचाही समावेश
ही सगळी आभूषण स्वर्ण भेषाच्या दिवशी तिन्ही देवतांना घालण्यात येतात. भगवना जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेचं हे रुप पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. जगन्नाथाच्या रथयात्रेतला हा महत्त्वाचा भाग मानण्यात येतो.