पंढरपुरातून परतणाऱ्या भाविकांच्या एसटीचा अपघात; 30 जण जखमी

पंढरपूरवरून परतणाऱ्या एसटी बसला बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 30 प्रवाशी जखमी झाले.

पंढरपूर सोहळा आटोपून परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चिखली तालुक्यातील महाबीज कार्यालयासमोर एसटी बस दुभाजकावर आदळून पलटी झाल्याचं समजते. या अपघातात 30 भाविक जखमी झाले. संबंधिताना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे,

51 प्रवासी सुखरूप; जखमींवर उपचार

या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 51 प्रवाशी होते. जखमींना तातडीने चिखली व बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस पंढरपूरहून खामगावच्या दिशेने जात होती. बसमध्ये एकूण 51 भाविक प्रवास होते. पहाटेच्या सुमारास चिखली शहराजवळ महाबीज कार्यालयाच्या समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. अपघात इतका भीषण होता, की बसचे मोठे नुकसान झालं आहे.

स्थानिकांची मदत आणि प्राण वाचले!

परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून त्यांना तातडीने चिखली व बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. लिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवाशांना मदत केली आणि अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे. पंढरपूरहून घरी परतत असताना हा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची चौकशी होणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News