Mansoon Session – पावसाळी अधिवेशनाचा आज चौथ्या दिवस आहे. अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी विरोधक आक्रमक होत राज्य सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. वारीही हिंदू धर्मातील पवित्र उत्सव आणि संस्कृती आहे. मात्र राज्य सरकारमधील नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्या विरोधात आज आपण सरकारचा निषेध म्हणून आंदोलन करत असल्याचं याविरोधकांनी सांगितले.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी…
दरन्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून विठुरायाला आणि वारकऱ्यांना बदनाम करत आहेत. त्यामुले आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या या अपमानकारक जुलमशाही विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी तिन्ही पक्षातील आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. म्हणजे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारानी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

घोटाळेबाज सरकारचा धिक्कार असो…
शेतकरी उपाशी.. मात्र मंत्री तुपाशी…वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… भूखंड लाटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो.. भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भ्रष्ट मत्र्यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी विरोधकांनी दिल्या.. तसेच वारीमध्ये अर्बन नक्षलवादी असतात अशी विधान सत्ताधारी करतात. त्या विरोधात पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. हातात संविधानाचे पुस्तक धरून वारीला बदनाम करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…जादूटोणा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… मंत्रोच्चार करून सोयाबीनचे पीक वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा देत विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले.