5 जुलैला येणार महाप्रलय ? त्सुनामी आणि भूकंपाच्या भीतीनं का हादरलंय जपान ?

जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 11% नी घटलीय. काही गेस्टहाउसने पर्यटकांना खोल्या देणं बंद केलंय. कारण त्यांचा वापर स्थानिकांसाठी निवारा म्हणून केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली – सध्या जगभरात चर्चा सुरु आहे ती एका महाप्रलयाची. एका जपानी कार्टूनमुळं सध्या जपान्यांची पुरती भंबेरी उडालीय. मंगा हे त्या कार्टूनचं नाव. या कार्टूनच्या ‘द फ्युचर आय सॉ’ या सीरीजमध्ये 5 जुलै 2025 रोजी प्रलयकारी भूकंप आणि त्सुनामी येण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळं सामान्य जपानी माणसासोबतच संपूर्ण जगाची झोप उडालीय.

त्यातच गेल्या दोन आठवड्यात जपानमध्ये आलेल्या लहानमोठ्या भूकंपांची सख्याही वाढलीय. गेल्या पंधरवड्यात तब्बल 900 हून अधिक भूकंप झाल्यानं, जपानमध्ये लोकांना झोपायला जायचीही भीती वाटू लागलीय.

भूकंपाची मालिका ते महाप्रलय?

21 जूनपासून टोकारा बेटांच्या आसपासच्या समुद्रात भूकंपरेषा अतिसंवेदनशील झालीय. दोन आठवड्यात बसलेल्या शेकडो भूकंपांमध्ये 5.5 तीव्रतेच्या भूकंपाचाही समावेश आहे.

झोपेच्या विकारांमध्ये वाढ

जपानमध्ये वाढलेल्या भूकंपांच्या धक्क्यांमुळे स्थानिक रहिवाशांना यामुळे रात्रभर झोप लागत नाहीये. काहींना रात्री-अपरात्री मोठमोठे आवाज ऐकू येताहेत.

5 जुलैच्या अफवा आणि मंगाची भूमिका

‘द फ्युचर आय सॉ’ नावाच्या या जपानी मंगा कॉमिक सिरीजमध्ये 5 जुलै हा प्रलयंकारी भूकंपाचा दिवस असल्याचा उल्लेख आहे. पण मंगातर्फे र्यो तात्सुकी यांनी ही सोशल मीडियावjची अफवा असल्याचे सांगितलंय.

पर्यटन क्षेत्राला धक्का

जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 11% नी घटलीय. काही गेस्टहाउसने पर्यटकांना खोल्या देणं बंद केलंय. कारण त्यांचा वापर स्थानिकांसाठी निवारा म्हणून केला जाऊ शकतो.

विमानं रद्द, प्रवाशांचा नकार

काही कंपन्यांनी आपली विमानं रद्द केली. तर काही पर्यटक जुलै-ऑगस्टमध्ये जपानला जाण्याऐवजी सप्टेंबरनंतर प्रवास करण्याचा विचार करत आहेत.

वैज्ञानिकांनी नाकारली तारीख

हे सगळं असलं तरी, भूकंपाची अशी निश्चित तारीख कोणालाच सांगता येत नाही, यावर जपानसह सर्व वैज्ञानिक ठाम आहेत.

जपान सरकारही सज्ज

जपानमध्ये नानकाई ट्रफमध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता जी आधी 75 टक्के होती, ती आता 82 टक्के झाली आहे. त्यामुळे जपान सरकार एकंदरित भूकंपाचा धोका कमी करण्यासाठी काम करतेय.

5 जुलैला काय होणार?

तसं पाहिलं तर, जपान हा जगातील सर्वात भूकंपप्रवण देशांपैकी एक. याचं मुख्य कारण म्हणजे तो पॅसिफिक रिंग ऑफ फायर या भूकंपांसाठी सक्रिय असलेल्या पट्ट्यावर वसलेला आहे. त्यामुळे जपानमध्ये अनेकदा लहान लहान भूकंप होत असतात. पण त्यांची वारंवारता वाढल्यानं जपानी लोकांमधली ही भीती खूप वाढलीय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News