जशी डी गँग, तशी मोदी-शाहांची गँग, या सरकारवच कारवाई करण्याची वेळ आलेय, नाना पटोलेंचा घणाघात

देवनार ग्राऊंडचा कचरा पालिकेच्या पैशाने साफ करायचा, हा निर्णय़ तेव्हा सरकारने घेतला होता. आणि यासाठी करोडो रुपये पालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्यात आले. पण इथला कचराही साफ झाला नाही.

Nana Patole – तत्कालीन एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये देवनार डमिंग ग्राऊंडचा कचरा काढण्यासाठी कोट्यावधी रुपये पालिकेतून मंजूर करण्यात आले. हे कचरा काढण्याचे कंत्राट एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांना देण्यात आले होते. पण हा निर्णय मोदी-शाह यांच्या आदेशाने झाला होता. मोदी-शाह ही एक गँग आहे. जशी पूर्वी डी गँग होती. तशी मोदी-शहांची ऐ गँग आहे. असा प्रहार मुंबईतील डंम्पिंग ग्रांऊडच्या कचरा सफाईवरुन नाना पटोलेंनी सरकारवर केला.

सरकारमध्ये गँगवॉर सुरु…

दरम्यान, पुढे बोलताना पटोले म्हणाले की, तेव्हा कचरा साफ कऱण्याचे कंत्राट शिंदेंच्या माणसांना देण्यात आले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडून कंत्राट काढूण घेण्यात आले आहे. त्यामुळं सरकारमध्येच आता गँगवॉर सुरु आहे. अशी टिका नाना पटोलेंनी राज्य सरकारवर केली. तसेच याबाबत मी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला पण मुख्यमंत्री यांचे उत्तर देऊ शकले नाहीत. राज्यातील तिजोरी मोदी-शाह यांच्या सांगण्यावरून मोकळी केली जात आहे. असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी सरकारवर केला.

मोदी-शहांना खूष करण्यासाठी…

केवळ राज्यातील पैसै मोदी-शहांना देण्यासाठी आणि शिंदेंनी आपल्या माणसांना कंत्राट देण्यासाठी केवळ त्यावेळी हा निर्णय घेतला होता. अशी टिका आमदार नाना पटोलेंनी राज्य सरकावर केली. दुसरीकडे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बालसुधारगृहातून ९ मुलींनी पलायन केले आहे. आमच्या रुममध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाताहेत, त्यामुळं आमच्या स्वांतत्र्यावर घाला येत आहे, असा आरोप त्या मुलींना केला आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, या सरकारवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. या सरकारमध्ये कोणीही सुरक्षित नाही. अशी टिका नाना पटोलेंनी केली आहे. तर याबाबत मी माहिती घेऊन बोलन, असं भाजपा आमदार आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News