मगरींनी, अजगरांनी वेढलेला तुरुंग, कैद्यांना पळणं अशक्य, फ्लोडिरात डोनाल्ड ट्रम्प यांनी का बांधला हा तुरुंग?

फ्लोरिडा तुरुंगावर ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं दर वर्षाला साधारण 450 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च करण्यात येणार आहे. कैद्यांसोबतच स्थलांतरितांना कठोर संदेश देण्याचं काम यातून करण्यात आलंय.

फ्लोरिडा – भयंकर मगरी, अजगर, जंगली श्वापदं कैद्यांचा आजुबाजूला फिरत असतील तर काय बिशाद आहे त्यांना ओलांडून कैद्यांती पुढं जाण्याची? अमेरिकेच्या फ्लोरिडा भागात ट्रम्प प्रशासनानं बांधलेल्या हा नव्या जेलमध्ये कैद्यांनी पळून जाऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आलीय. स्थलांतरीतांसाठी बांधलेल्या या जेलच्या अवतीभोवती अक्राळविक्राळ मगरींचा गराडा असणार आहे.

फ्लोरिडामध्ये 39 चौरस मैलांमध्ये बनवण्यात आलेला ‘अ‍ॅलिगेटर अल्काट्राझ’ नावानं हा तुरुंग उभारण्यात आलाय. या तुरुंगाभोवती असंख्य मगरींचा आणि अजगरांचा वावर आहे. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस आणि अटर्नी जनरल जेम्स उथमायर यांनी पुढाकार घेऊन या खास तुरुंगाची उभारणी केलीये. हा ट्रम्प प्रशासनाच्या कठोर स्थलांतरित धोरणाचा भाग असल्याचं सांगण्यात येतंय.

कसा आहे फ्लोरिडाचा मगरींनी वेढलेले तुरुंग ?

या तुरुंगात पोहचण्यासाठी डेड-कॉलियर ट्रेनिंग अँड ट्रान्झिशन विमानतळावर उतरावं लागणार आहे. एव्हरग्लेड्सच्या दलदलीच्या मध्यभागी तुरुंगाची उभारणी करण्यात आलीय. तुरुंगात सुमारे 5 हजार स्थलांतरितांना किंवा कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. स्थलांतरितांसाठी हजाराहून जास्त बेड्सची व्यवस्था करण्यात आलीय.
या ठिकाणाची निवड जाणीवपूर्वक करण्यात आलीये. कारण येथील मगरींसारख्या नैसर्गिक घटकांमुळे सुरक्षा आणखी वाढेल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे

तरुंग बांधल्यानंतर टीकेची झोड

हा प्रकल्प सुरू झाल्यापासूनच प्रचंड टीकेचा धनी बनलाय पर्यावरणवादी संघटना, स्थानिक मिकोसुकी आदिवासी गट आणि विविध मानवाधिकार संस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय. दोन प्रमुख पर्यावरणवादी गटांनी तर या प्रकल्पाविरोधात खटलाही दाखल केलाय.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या जेलच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. आता होणाऱ्या विरोधानंतर हा तुरुंग तसाच राहील की यावरही ट्रम्प माघार घेतील हे पाहावं लागणार आहे.

फ्लोरिडा तुरुंगावर कोट्यवधी डॉलर्सचा खर्च

फ्लोरिडा तुरुंगावर ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं दर वर्षाला साधारण 450 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च करण्यात येणार आहे. कैद्यांसोबतच स्थलांतरितांना कठोर संदेश देण्याचं काम हा तुरुंग बांधून देण्यात आल्याचं मानण्यात येतंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News