बर्मिंघम – भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरी टेस्ट बर्मिंघमच्या एजबेस्टन स्टेडियममध्ये सुरु आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात कॅप्टन शुभमन गिलनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. शुभमननं डबल सेंच्युरी करत मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. इंग्लंडविरोधातल्या टेस्टमध्ये इतका मोठास्कोअर करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरला आहे.
भारतानं पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट गमाववून 508 रन्स केल्या आहेत. सध्या शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे बॅट्समन खेळतायेत. शुभमनच्या कामगिरीमुळे भारताचा स्कोअर चांगल्या स्थितीत आहे.

सुनील गावसकरांचा रेकॉर्ड मोडला
शुभमन गिलनं हैरी ब्रुकच्या ओव्हरमध्ये एकापाठोपाठ 3 चौकार मारत त्याचा वैयक्तिक स्कोअर 222 रन्सवर नेला.
शुभमनच्या आधी सुनील गावसकर यांनी इंग्डविरोधात 221 रन्स केले होते. हा रेकॉर्ड शुभमन गिलनं मोडलाय. यासोबतच इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी करणारा शुभमन हा पहिला भारतीय कॅप्टन ठरला आहे. टेस्ट करिअरमध्येही शुभमनचा हा बेस्ट स्कोअर आहे. यापूर्वी त्यानं गेल्याच मॅचमध्ये 147 रन्स केले होते. गिलचं हे सातवं टेस्ट शतक आहे.
सचिन आणि विराटचाही रेकॉर्ड मोडला
सर्वात कमी वयात डबल सेंच्युरी करणाऱ्या अनेक भारतीय कॅप्टन्सचा रेकॉर्डही शुभमनन मोडला आहे. यात सचिन आणि वारट कोहलीलाही त्यानं माग टाकलंय. आता या यादीत पटौदी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी शुभमन गिलनं त्याचं नाव पटकावलंय.
इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई
दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या दिवसापासून चमकदार कामगिरी करत शुभमन गिलनं इंग्लंडच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली आहे. इंग्लंडमध्ये अशी दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सच्या यादीत यामुळं शुभमननं महत्त्वाचं स्थान मिळवल्याचं मानण्यात येतंय. शुभमनपूर्वी कॅप्ट्न इनिंगमध्ये अझरुद्दीन यांनी 1990 साली इंग्लंडमध्ये 190 रन्स केले होते.
शुभमनकडून नव्या आशा
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत जाण्याचा मान या निमित्तानं शुभमन गिलला मिळालेला आहे. विराटच्या निवृत्तीनंतर नव्या नेतृत्वाच्या शोधात टीम इंडिया असताना शुभमननं इंग्लड टेस्टमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळं नवं नेतृत्व टीम इंडियाला मिळाल्याचं मानण्यात येतंय.