मुंबई- रामायणावर नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यात अभिनेता रणबीर कपूरनं रामाची भूमिका साकारली आहे. या रामायण सिनेमाचा फ्रर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलाय. ३ ते ४ सेंकदांच्या या क्लिपमध्ये वापरण्यात आले्या व्हीएफएक्स तंत्रानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रभू श्रीरामाची भूमिका या सिनेमात रणबीर कपूर साकारणार आहे. तर रावणाच्या रुपात यश असेल.
कसा आहे रामायण सिनेमाचा फर्स्ट लूक?
या व्हिडीओची सुरुवात ब्रह्मा. विष्णू आणि महेशानं केलेली आहे. फर्स्ट लूकमध्ये रणबीर कपूर श्रीरामाच्या वेशात चांगलाच उठून दिसतो आहे. रामाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी रणबीर कपूरनं बरेच कष्ट घेतल्याचं फ्रस्ट लूकमधून जाणवतंय. रणबीरनं या सिनेमासाठी धनुष्य-बाण चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्याचीही माहिती आहे.

या व्हिडीओत रामासोबत रावणाचाही पहिला लूक पाहायला मिळतो आहे. दक्षिणेतील सुपरस्टार यश यानं रावणाची भूमिका साकरली आहे. यश आणि रणबीर या दोन्ही अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. एका दृश्यात राम आणि रावण दोघेही आमनेसामने पाहायला मिळतायते. यात हे युद्धा किती व्यापक स्वरुपात दिसणार आहे, याची झलक पाहायला मिळतेय.
रामायण सिनेमाविषयी रंजक माहिती
या व्हिडीओसोबत सिनेमासाठी वापरण्यात आलेल्या संगिताची झलकही पाहायला मिळतेय. सिनेमासाठी दमदार पार्श्वसंगीत वापरल्याचं फर्स्ट लूकमधून जाणवतंय.
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनात रामायण सिनेमाची निर्मिती होत असून, नमित मल्होत्रा यांचा प्राईम फोकस स्टुडिओ आणि 8 वेळा ऑस्करचे मानकरी ठरलेल्या व्हीएफएक्स स्टुडिओ डीएनईजी हे मिळून सिनेमाचे निर्माते आहेत. हंस जिमर आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गजांनी या सिनेमाचं संगीत केलंय.
रामायण सिनेमातील युद्धाचे प्रसंग हॉलिवूडचे टॉप स्टंट डारेक्टर टेरी नोचरी आणि गाय नॉरिस हे कोरिओग्राफ करतायेत. लहानपाणाून ऐकलेलं आणि अनेकांच्या भावविश्वात असलेलं रामायण पडद्यावर भव्य स्वरुपात सादर करणार असल्याचं नितेश तिवारी यांनी सांगतिलंय. सिनेनात साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या रुपात पाहायला मिळणार आहेत. सिनेमा दोन भागात येणार असून 2026 साली दिवाळीत याचा पहिला भाग तर 2027 च्या दिवाळीत या सिनेमाचा दुसरा भाग रीलिज होण्याची शक्यता आहे.