नाशिकमधील ‘उबाठा’ गटाचे शेकोडो कार्यकर्ते व नेत्यांचा भाजपात प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की…

मी आता पदभार स्वीकारला आहे, त्यामुळे संघटनात्मक बांधणीसाठी काम करणार असून, ज्या कार्यकर्त्यांनी आज भाजपा प्रवेश केला आहे. त्यामुळे आणखी आमची ताकद वाढली असं चव्हाण म्हणाले.

Ravindra Chavan – नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आपली जबाबदारी वाढली असल्यास म्हटलं होतं. यानंतर बुधवारी पुणे मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. तर नाशिक मधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार अपूर्व हिरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. यानंतर आज नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते आणि नेते यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

संघटनात्मक बांधणीसाठी काम करणार…

दरम्यान, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे मोदी हे दिवस-रात्र काम करून देशाला विकासाच्या चालण्यात येत आहेत आणि 2047 पर्यंत देशाला महाशक्तिशाली बनवण्याचा संकल्प मोदींनी केला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे, असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केलं. तसेच मी आता पदभार स्वीकारला आहे, त्यामुळे संघटनात्मक बांधणीसाठी काम करणार असून, ज्या कार्यकर्त्यांनी आज भाजपा प्रवेश केला आहे. त्यामुळे आणखी आमची ताकद वाढली असं चव्हाण म्हणाले.

सर्वांना न्याय देणार…

दुसरीकडे कोणत्याही कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना निराश करणार नाही, सर्वांना योग्य ते न्याय देणार असं रवींद्र चव्हाण म्हणाले. तसेच आज नाशिकमधील उबाठाचे माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, कमलेश बोडके तसेच उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख कन्नु ताजणे यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, सुधाकर बडगुजर, नवनाथ बन आदी उपस्थित होते.


About Author

Astha Sutar

Other Latest News