Disha Salian Murder Case : माझी केवळ बदनामी करण्याचा नेहमीच प्रयत्न केला गेला. मात्र मी याबाबत काहीही बोललो नाही आणि बोलणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. आज दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंना एसआयटीकडून क्लिन चीट देण्यात आली आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया येत असताना, आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
काहीही बोलणार नाही…
दरम्यान, या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र मी या प्रकरणात आपण काहीही बोललो नाही. व पुढेही बोलणार नाही. केवळ आपली बदनामी करण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. एसआयटीकडून न्यायालयात आदित्य ठाकरे यांच्याबाबत काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले गेले आहे. पुणे येथील बलात्कार प्रकरणी बोलताना आदित्य म्हणाले की, राज्यात काय चालू आहे, याचे हे एक उदाहरण आहे. काही गुन्हे नोंदवले जातात तर काही नाही, हे अत्यंत धक्कादायक प्रकार आहे.

अद्याप क्लोजर रिपोर्ट नाही…
दुसरीकडे एसआयटीने केवळ अहवाल दिला आहे. क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही. अहवालामध्ये काही आक्षेपार्ह नाही, असे जरी म्हटले असले तरी अजून याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात आली असे म्हणता येणार नाही. अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. तर दुसरीकडे दिशाच्या वडीलांनी रिपिटीशन कोर्टात दाखल केली आहे.
पिक्चर अभी बाकी है…
आदित्य यांना अद्याप क्लीनचीट दिलेली नाही. हा केवळ एक अहवाल आहे, जो 17 जूनला देण्यात आला होता. तो आता समोर आला आहे, मात्र याबाबात येत्या 16 तारखेला सुनावणी आहे. त्या सुनावणीत आणखी काही गोष्टी समोर येणार आहेत. दिशा सालियान यांच्या वडिलांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दिले आहे. आणि काही आरोपींची नावे दिली आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजूनही अनेक गोष्टी समोर येतील, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… असेही राणे म्हणालेत.