कोलकता : राजस्थान विरूद्धच्या सामन्यात अवघ्या एका धावेने सनसनाटी विजय मिळवत कोलकताने आपले प्लेऑफमध्ये जाण्याचे आव्हान जिवंत ठेवले. कोलकताना 206 धावा केल्या. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान 205 धावांपर्यंत मजल मारू शकली.
कोलकताच्या विजयात कर्णधार अजिंक्य राणे 30, अंगक्रिश रघुवंशी 44, रसेल 57 यांनी फलंदाजीत चमक दाखवली तर गोलंदाजीत मोईन अली, हर्षित राणा आणि वरूण चक्रवती यांनी प्रत्येक दोन विकेट काढत राजस्थानच्या फलंदाजांना रोखले

वैभव सूर्यवंशी फेल
मुंबई विरूद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी हा शून्यावर आऊट झाला होता. त्यामुळे या सामन्यता तो काय करतात करतो याची उत्सुकता होता. पहिल्याचा चेंडूवर चौकार मारून त्याने आपले आक्रम इरादे स्पष्ट केले होते. मात्र, वैभव अरोराच्या दुसऱ्याच बाॅलवर तो अजिंक्य राहणेकडे कॅच देत आऊट झाला.
रियान परागची फटकेबाजी
206 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा निम्म संघ 71 धावांवर तंबूत परत होता. राजस्थााची अवस्था पाच 71 झाली असताना त्यांचे आव्हान कर्णधार रियान पराग याने कायम ठेवले. त्याने 45 चेंडूत 6 चौकार आणि आठ सिक्सच्या मदतीने 95 धावांची वादळी खेळी केली. हर्षित राणाने त्याला वैभव अरोराकडे झेलबाद केले आणि कोलकताच्या विजयातील मोठा अडसर दूर केला.
रसलने दाखवले मसल
मागील काही सामन्यात फेल ठरलेला कोलकताचा हिटर आंद्रे रसलने राजस्थानाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 25 चेंडूत सहा सिक्सच्या मदतीने 57 केल्या. तर, कर्णधार अजिंक्य राहणे याने 24 चेंडूत 30 धावांची संयमी खेळी केली तर अंगक्रिश रघुवंशी याने फटकेबाजी करत 44 धावा जोडल्या.