‘पंजाब’ प्लेऑफच्या जवळ, लखनौचा दारुण पराभव, प्रभसिमरन सिंगचा तडाखा

लखनौची अवस्था पाच बाद 73 झाली असताना आयुष बदोनीने लखनौचा डाव सावरला. बदोनीने 40 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 74 रन्स केले

हिमाचल प्रदेश : लखनौचा दारुण पराभव करत पंजाब प्लेऑफच्या शर्यतीत थेट दुसर्‍या स्थानावर पोहोचला. पंजाबचा ओपनातर प्रभसिमरन सिंगचा तडाखा लखनौला भोवला. त्याने 48 चेंडूत सात षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 91 धावा कुटल्या. त्यामुळे पंजाबने 237 धावांचे टार्गेट दिले होते. मात्र, हे आव्हान लखनौचा संघ पेलू शकला नाही.

लखनौचे 73 धावांमध्ये त्यांचे पाच फलंदाज बाद झाले होते. 199 धावाच लखनौचा संघ करू शकला त्यामुळे 37 धावांनी त्यांच्या वाट्याला पराभव आला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना प्रभासिमरन आणि जोश इंग्लीशच्या आक्रमत 30 धावांमुळे मोठे टार्गेट लखनौला दिले. कर्णधार श्रेयश अय्यर याने देखील तुफान फटकेबाजी करताना 45 धावा सोडल्या.

अर्शदीप सिंग ठरला कर्दनकाळ

लखनौच्या फलंदाजांसाठी पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग कर्दनकाळ ठरला. 236 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौला पहिल्याच षटकात अर्शदीपने जखडून ठेवले आणि अवघ्या तीन धावा केल्या. त्याचे इनस्विंग आणि आऊटस्विंगपुढे लखनौची बॅटींग कोसळली. त्याने चार षटकात अवघ्या 16 धावा देत मार्कम, निकोलस पूरन, मिशच मार्श या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करून लखनौचे कंबरडे मोडले. त्याला अजमतुल्ला उमरझाई याने देखील चांगली साथ दिली त्याने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

बदोनीने सावरले

लखनौची अवस्था पाच बाद 73 झाली असताना आयुष बदोनीने लखनौचा डाव सावरला. बदोनीने 40 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 74 रन्स केले. तर, अब्दुल समद याने देखील 24 चेंडूत चार षटकाराच्या मदतीने 45 धावा केल्या. मात्र बदोनी आणि समदची फलंदाजी लखनौचा पराभव टाळू शकली नाही. पूर्ण संघ मिळून ते 199 धावा करू शकले. आणि त्यांना 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News