सीता नवमीचा दिवस सीतेच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी सीतेची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आणि स्थिरता येते. दरवर्षी सीता नवमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. पौराणिक मान्येतनुसार या दिवशी सीता देवी पृथ्वीवर प्रकट झाली होती असे म्हटले जाते. त्यासाठी हा दिवस सीता नवमी किंवा सीता जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या नात्यात गोडवा येण्यासाठी उपवास करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या खास दिवशी काही सोपे उपाय केल्यास पती-पत्नीमधील मतभेद संपू शकतात आणि जीवनात आनंद आणि शांती नांदू शकते. सीता नवमीला जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते जाणून घेऊया.
सीता नवमीला हे उपाय करा
सिंदूर अर्पण करावे
या दिवशी, विवाहित महिलांनी माता सीतेच्या मूर्ती किंवा चित्राला सिंदूर अर्पण करावे आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रेमासाठी प्रार्थना करावी. यामुळे वैवाहिक जीवनात स्थिरता येते.

पिवळे वस्त्र परिधान करावे
या दिवशी पिवळे कपडे घालून पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख-शांती येते.
गरिबांना दान करा
या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मण महिलेला बांगड्या, बिंदी, सिंदूर यासारख्या श्रृंगाराच्या वस्तू दान केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. हा उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी येते. पतीला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद मिळतो. या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरातील पैशांची कमतरता दूर होते.
वैवाहिक जीवनात तणाव कमी होतो
पूजा करताना कपाळावर हळद आणि चंदनाचा टिळा लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि वैवाहिक जीवनात तणाव कमी होतो.
तुपाचा दिवा
सीता नवमीच्या रात्री, तुमच्या लग्नाच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा आणि तुमच्या नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी भगवान राम-सीतेला प्रार्थना करा. भगवान राम-सीतेला प्रार्थना करून, तुम्ही तुमच्या नात्यात प्रेम आणि सौहार्द टिकवून ठेवू शकता. तुपाचा दिवा लावणे हा एक पारंपरिक आणि पवित्र प्रकार आहे, जो धार्मिक आणि शुभ प्रसंगात वापरला जातो. लग्नाचे फोटो हे नात्यातील प्रेम आणि बंधनाचे प्रतीक आहेत. त्यांच्यासमोर प्रार्थना करणे म्हणजे नात्याला अधिक दृढ करणे. तुम्ही राम-सीतेला तुमच्या नात्यातील प्रेम वाढावे, वाद दूर राहावे, आणि आयुष्य आनंदी आणि समृद्ध होण्यासाठी प्रार्थना करू शकता.
मंत्राचा जप
सीता नवमीच्या दिवशी, माता सीतेचा मंत्र “श्री सीतायै नमः” आणि भगवान रामाचा मंत्र “श्री रामाय नमः” या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. आपल्या पतीचे नाव घेऊन, या मंत्राचा जप केल्यास, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अशी मान्यता आहे.
कधी आहे सीता नवमी?
सीता नवमी दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीची सुरूवात 5 मे 2025 रोजी सकाळी 7:35 ला होईल. वैशाख शुक्ल नवमी तिथीची समाप्ती 06 मे 2025 रोजी सकाळी 08:38 वाजता असेल.
सीता नवमी पूजा पद्धत
या दिवशी देवी सीतेची पूजा करणे शुभ मानले जाते. सीता नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर देवघरात लाल रंगाचा कापड पसरवून भगवान श्रीराम आणि माता सीतेचा फोटो ठेवावा. पाण्यात गंगाजल मिसळून भगवान श्रीराम आणि माता सीतेचा फोटो त्या पाण्याने पुसून घ्यावा. त्यानंतर विधीनुसार पूजा करावी. पूजेत फळे, फुले, धूप, दिवा, सिंदूर, तीळ, जव आणि अक्षता यांचा वापर करावा. पूजेच्या वेळी सीता चालिसाचा पाठ करावा. ओम सीताये नम: मंत्राचा जप 108 करा. लाल, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. मनोभावे प्रर्थाना करा. आरती बोलून सुख, समृद्धी, संपती आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)