पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वीचा निकाल उद्या (सोमवारी) जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला जाईल.विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात 12 वीची परीक्षा झाली होती. 15 मेपर्यंत निकाल जाहीर केला जाईल, अशी शक्यता होती. मात्र, निकाल उद्याच (मंगळवारी) जाहीर होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

कुठे पाहाल निकाल?
mahresult.nic.in
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org/
या वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक बिनचूक टाकायचा आहे. शिवाय आपल्या आईचे नाव टाकणे देखील आवश्यक असेल. विद्यार्थी ऑनलाईन आपले निकला पाहू शकतील त्यानंतर तेथून निकालपत्राची झेराॅक्स देखील डाऊनलोड करू शकतील.
मंगळवारपासून गुणपत्रिकेचे वाटप
विद्यार्थी ऑनलाईन आपले गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतात. मात्र, ओरिजन गुणपत्रिकेचे वाटप मंगळवार (ता.6) महाविद्यालयांमध्ये केली जाणार आहे. त्यानंतर लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेशाचे प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, 12 वीच्या निकालानंतर 10 चा निकाल 15 मेच्या दरम्यान घोषित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.