दिल्ली : राहुल गांधी हे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या त्या दौऱ्यातील ब्राउन युनिव्हर्सिटीमधील एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार मोठी चूक होती अशी कबूली राहूल गांधी यांनी दिली आहे. भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमिल मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, देशातच नाही तर परदेशातही राहुल गांधींवर टीका होत आहे.
एका शिख विद्यार्थ्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसकडून 80 च्या दशकात खूप चूक झाल्या. मी तेव्हा तेथे नव्हतो. मात्र, मी जबाबदारी घेण्यास तयार आहे. मला वाटत नाही की शीख समुदाय आता कोणत्या गोष्टीची भीती बाळगतो.

विद्यार्थी राहुल गांधींना काय म्हणाला?
राहुल गांधी हे ब्राऊन युनिव्हर्सिटी असताना एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला तेव्हा एका शिख विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न केला होती तुम्ही शीखांची बाजू घेता पण तुम्ही शीखांमध्ये भीती निर्माण करता की भाजप काय करेल. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, जे काँग्रेसच्या काळात नव्हते. दलित अधिकारांची मागणी करणारा आनंदपूर साहिब ठराव होता काँग्रेसने त्याला फुटीरवादी घोषित केले. तर सज्जन कुमार यांना कोर्टाने शिखा केली असली तरी तसे व्यक्ती अजूनही काँग्रेसमध्ये आहे.
दंगलीत तीन हजार शीख मारले गेले
ऑपरेशन ब्लू स्टारनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या अंगरक्षकांनी केली. त्यानंतर झालेल्या दंगलीत सरकारी आकडेवारीनसुार तब्बल तीन हजारापेक्षा अधिक शीख नागरिक मारले गेले. पंजाबमधील दहशतवादाविरोधात ऑपरेशन ब्लू स्टार चालवले होते. यात बिंद्रेवाला मृत्यू झाला आणि अकाल तख्तचे मोठे नुकसान झाले. धार्मिक भावना दुखावल्यामुळे इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या शीख अंगरक्षकांकडून करण्यात आली होती.