IPL चे वेळापत्रक पुन्हा बदलले, भारत-पाकिस्तान तणाव नाही, तर BCCI ने दिलं नवं कारण, पाहा

RCB व्यवस्थापनाला मंगळवारी संध्याकाळीच वेन्यू बदलण्याची माहिती देण्यात आली होती. RCB साठी हा वेन्यू बदल एक सकारात्मक बातमी मानली जाऊ शकते, कारण लखनऊमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता जवळपास नाहीच.

SRH vs RCB Match Venue Shifted IPL 2025  : आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. मात्र, यावेळी संपूर्ण स्पर्धेचे नाही, तर केवळ एका सामन्याच्या ठिकाणात बदल झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता, पण आता तो सामना लखनऊ येथे खेळवण्यात येईल.

यामागील कारण म्हणजे खराब हवामान सांगितले गेले आहे. तुम्हाला आठवण करून देतो की, १७ मे रोजी RCB आणि KKR यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता.

आरसीबीसाठी गुड न्यूज

रिपोर्ट्सनुसार, RCB व्यवस्थापनाला मंगळवारी संध्याकाळीच वेन्यू बदलण्याची माहिती देण्यात आली होती. RCB साठी हा वेन्यू बदल एक सकारात्मक बातमी मानली जाऊ शकते, कारण लखनऊमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता जवळपास नाहीच. हवामानाच्या अडथळ्यामुळे RCB चा थेट क्वालिफायर १ मध्ये जाण्याचा संधीवर परिणाम होऊ शकतो.

आरसीबी दुसऱ्या स्थानावर

सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉइंट्स टेबलमध्ये १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे लीग स्टेजमधील २ सामने अजून बाकी आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 2 सामने उरले आहेत आणि ते IPL २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये फिनिश करून थेट क्वालिफायर १ मध्ये पोहोचू शकतात. त्यांना अजून SRH आणि LSG विरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News