Pune – राज्यात मान्सून 7 जुन रोजी दाखल होणार आहे. यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईप्रमाणे पुणे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत असतात. यासाठी पुणे पालिका आरोग्य विभाग अकशन मोडवर आला आहे.
महापालिकेकडून उपायोजना…
दरम्यान, पावसाळ्यात साथीचे आजार वाढू नये यासाठी पुणे महापालिकेच्या उपायोजना करण्यात येत आहे. यासाठी पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे तसेंच पावसाळ्यात कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, काविळसारखे आजार होऊ नये यासाठी खबरदारी घ्या… असे पुणे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. याबाबत महापालिकेने पुणेकरांना सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घ्या…, असे पुणे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना…
दुसरीकडे पुणे परिसरात पावसाळ्यात साथीचे आजार वाढू नये यासाठी महापालिकेचे रुग्णालय देखील सज्ज झाले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयात ५० बेडचा वॉर्ड महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, पालिका स्तरावर साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. पावसाळ्यात गॅस्ट्रो, कॉलरा, टायफाईड, काविळसारखे आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच सर्दी, खोकला आणि फडसे आल्यास त्वरित उपचार घावेत. तसेच डॉक्टर यांच्या सल्ल्याने औषध घ्यावीत असं पुणे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.