Maonsoon In Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने मान्सूच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. यानुसार यंदा वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल होणार आहे. त्यानंतर अवघ्या १० दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती आहे. राज्यात मान्सून कधी दाखल होणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मान्सून महाराष्ट्रात कधी?
कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार, मान्सूनने १३ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर एन्ट्री केली आहे. त्यानंतर मान्सून बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या काही भागात सक्रीय झाला आहे.

गूड न्यूज! मान्सून 'या' तारखेपर्यंत महाराष्ट्र येणार हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
५ जूनपर्यंत मान्सून राज्यात
आता २७ मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर ५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे. यानंतर १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे.