Eighth Pay Commission Updates : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. सुमारे ५० लाख सरकारी कर्मचारी आणि सुमारे ६८ लाख पेन्शनधारक ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच, त्यांचा पगार किती वाढेल, फिटमेंट फॅक्टर असेल का आणि हे सर्व कधी लागू होईल याबद्दल त्यांना उत्सुकता आहे.
दर १० वर्षांनी होणाऱ्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचार्यांच्या पगारात चांगली वाढ होते. त्याचबरोबर त्यांच्या निवृत्तीवेतन आणि डीएमध्येही वाढ होते. ज्या वेळेस हे लागू होईल ते २०२६ मध्ये म्हणजेच पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

पुढील वर्षापासून लागू होणार आठवा वेतन आयोग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो आणि सरकार १ एप्रिल २०२६ पासून ते लागू करू शकते. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी देखील डिसेंबर २०२५ मध्ये संपत आहे. असे म्हटले जात आहे की यावेळी सरकारी अधिकाऱ्यांचे वेतन विशेष फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल.
हे असंही समजून घ्या की, ७ व्या वेतन आयोगादरम्यान २.५७६ चा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, परंतु ८ व्या वेतन आयोगात सरकार २.८६ चा फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते.
पगार कोणत्या आधारावर ठरवला जाईल?
असेही म्हटले जात आहे की सरकार आठव्या वेतन आयोगात १.९२ चा घटक विचारात घेऊ शकते. जर या सर्व बाबी लक्षात घेऊन पगाराची गणना केली तर, सरकारने ३ किंवा त्याहून अधिक फिटमेंट फॅक्टर लागू केला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत, किमान १९,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते आणि त्यांचे किमान वेतन ५१,००० रुपयांपेक्षा जास्त असू शकते. तर किमान पेन्शन देखील २५ हजार रुपयांपेक्षा जास्त वाढू शकते.