Pankaja Munde – पशुवैद्यकीय दवाखान्याबबत एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याने व्हावेत या मागणीला जोर धरत होता. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात नवीन पशुवैद्यकीय दवाखाने बांधण्यात येणार आहे. दरमायन, नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना यापुढे राज्यभरासाठी एकसारखा असा टाईप प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यभर एकसारखा असा टाईप प्लॅन असावा…
दरम्यान, यापुढे नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतींचे बांधकाम करत असताना संपूर्ण राज्यभर एकसारखा असा टाईप प्लॅन तयार करून इमारती बांधल्या जातील. असे यावेळी बैठकीत बोलताना मंत्री पंकजाताई म्हणाल्या की, अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला नवीन इमारतींची गरज आहे. ती गरजही तातडीने पूर्ण करावी. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक पार पडली,

त्यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे बोलत होत्या. खरीप हंगाम पूर्व आणि जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा तसेच जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प असलेले प्रस्तावित विमानतळ, अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, कृषी महाविद्यालय परळी, बिंदुसरा स्वच्छता, जिल्हा क्रीडा संकुल, शासकीय इमारती आदी विविध विषयांचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.
बीड, जालन्यात विशेष तरतूद
दुसरीकडे बीड व जालना जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याकरिता राज्य स्तरावरून निधीची विशेष तरतूद करण्यात येईल असं मंत्री पंकजाताई मुंडे यावेळी सांगितलं. परळी येथे होत असलेल्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित कामाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच बीड व जालन्यात जिल्ह्यातील विशेष कामाना तरतूद देण्यात आली. तसेच राज्यातील नवीन पशुवैद्यकीय दवाखाने वाढवण्याचे गरज आहे. असे त्यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.