‘हेरा फेरी ३’ चा वाद मिटेना! २५ कोटींसाठी अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यात बिनसलं, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

बाबूरावच्या आयकॉनिक भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेता परेश रावल यांनी मागील आठवड्यातच जाहीर केले की ते ‘हेरा फेरी ३’ चा भाग नाहीत.

Hera Pheri 3: आयकॉनिक कॉमेडी फ्रँचायझी ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग म्हणजेच ‘हेरा फेरी ३’ सध्या वादांमुळे चर्चेत आहे.  याचे नवीनतम प्रकरण चित्रपटाशी संबंधित एका मोठ्या कायदेशीर लढाईचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या प्रोडक्शन कंपनीने अभिनेते परेश रावल यांना २५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी लीगल नोटीस पाठवली आहे.

माहितीनुसार, ही नोटीस ‘हेरा फेरी ३’ मधून परेश रावल यांच्या कथित माघारीमुळे आणि कॉन्ट्रॅक्टशी संबंधित काही अटींच्या उल्लंघनामुळे पाठवण्यात आली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही बातमी आगीसारखी पसरली आहे, कारण अक्षय आणि परेश यांची जोडी या फ्रँचायझीचा अविभाज्य भाग मानली जात होती.

प्रोडक्शन कंपनीचं काय म्हणणं आहे?

अक्षय कुमार यांच्या प्रोडक्शन कंपनीचा दावा आहे की, परेश रावल यांना त्यांच्या नेहमीच्या मानधनाच्या तिप्पट रक्कम देण्यात येत होती. मात्र, त्यांनी व्यावसायिक नीतिमत्ता आणि व्यावसायिक वर्तनाकडे दुर्लक्ष केले आहे.

जर त्यांचा चित्रपट पूर्ण करण्याचा कोणताही मानस नव्हता, तर त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि आगाऊ रक्कम घेण्यापूर्वी आणि निर्माता यांनी चित्रपटाच्या शूटिंगवर मोठा खर्च करण्यापूर्वी हे स्पष्ट करणे गरजेचे होते.

परेश रावल काय म्हणाले?

फ्रँचायझीतील बाबूरावच्या आयकॉनिक भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेता परेश रावल यांनी मागील आठवड्यातच जाहीर केले की ते ‘हेरा फेरी ३’ चा भाग नाहीत. त्यांच्या या निर्णयाने फक्त चाहत्यांनाच नाही तर सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि त्यांच्यात गहन निराशा देखील निर्माण झाली.

याबाबत अभिनेता परेश रावल म्हणाले, आहेत की फ्रँचायझीपासून स्वतःला वेगळे करण्याचा त्यांचा निर्णय कोणत्याही सर्जनात्मक मतभेदांमुळे (Creative Differences) झाला नाही. ‘हेरा फेरी ३’ सोडण्याबाबत त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

परेश यांनी ट्विटरवर लिहिले की, “मी हे नोंदवू इच्छितो की ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडण्याचा माझा निर्णय कोणत्याही सर्जनशील मतभेदामुळे नाही. मी पुन्हा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी माझे कोणतेही मतभेद नाहीत. दिग्दर्शक प्रियदर्शनबद्दल मला खूप प्रेम, आदर आणि विश्वास आहे.”


About Author

Rohit Jernavare

Other Latest News