कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, ६ जणांचा मृत्यू

दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली कोणी दबले आहे का याचा शोध घेतला जात आहे.

Kalyan Building Slab Collapse  : मुंबईच्या कल्याणमध्ये मोठी दुर्घटना झाली आहे. एका ४ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ लोक जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

इमारत ‘धोकादायक’ घोषित करण्यात आली होती

अधिकाऱ्यांनी सांगितले, की इमारतीचा स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केडीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की ही इमारत ‘धोकादायक’ घोषित करण्यात आली होती आणि पावसाळ्यापूर्वी ती रिकामी करण्यात यावी, असा आदेश दिला गेला होता. केडीएमसीच्या सूत्रांनुसार, परिसर रिकामा करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी नोटीसही दिली गेली होती, मात्र अपघाताच्या वेळीही लोक त्या इमारतीत उपस्थित होते.

बचावकार्य सुरू

दुसरीकडे, दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली कोणी दबले आहे का याचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाच्या मते, या परिसरात अशा अनेक इमारती आहेत आणि त्या जीर्ण अवस्थेत आहेत.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News