एका जागेसाठी २ संघांमध्ये काँटे की टक्कर, मुंबई की दिल्ली, प्लेऑफचं तिकीट कोण मिळवणार? पाहा

प्लेऑफच्या शेवटच्या स्थानासाठी दोन संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.

IPL Playoffs Teams : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफची शर्यत आता अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यामध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स यांचा समावेश आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्स हा पाचवा संघ ठरला आहे, जो या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

आता प्लेऑफच्या शेवटच्या स्थानासाठी दोन संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे. यापैकी केवळ एक संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी काय करावं लागेल.

IPL प्लेऑफ संघ (IPL Playoffs Teams)

आत्तापर्यंत ३ संघ प्लेऑफसाठी निश्चित झाले आहेत

  • गुजरात टायटन्स (Gujarat Titans)
  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru)
  • पंजाब किंग्ज (Punjab Kings)

आता चौथ्या आणि अंतिम स्थानासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

प्लेऑफसाठी कोणाला किती संधी?

मुंबई इंडियन्स (MI)

गुण- १४
उरलेले सामने: २
कोणाविरुद्ध सामने बाकी आहेत – दिल्ली कॅपिटल्स (DC), पंजाब किंग्स (PBKS)

जर MI संघ उरलेले दोन्ही सामने जिंकतो, तर त्यांचे १८ गुण होतील आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक विजयही मुंबईसाठी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. मात्र, जर MI दोन्ही सामने हरला, तर ते स्पर्धेबाहेर पडतील.

दिल्ली कॅपिटल्स (DC)
सध्याचे गुण: १३
उर्वरित सामने: २ (मुंबई इंडियन्स विरुद्ध, पंजाब किंग्ज विरुद्ध)

DC साठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे गणित थोडेसे कठीण आहे. त्यांना त्यांच्या उरलेल्या दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि ही अपेक्षा ठेवावी लागेल की मुंबई त्यांच्या उरलेल्या सामन्यांपैकी किमान एक तरी सामना हरेल.

जर DC मुंबई इंडियन्सकडून हरली, तर त्यांची प्लेऑफची आशा जवळजवळ संपुष्टात येईल.

म्हणजेच, LSG बाहेर गेल्यानंतर प्लेऑफसाठी शेवटची जागा मिळवण्याची स्पर्धा आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. MI ला त्यांचे दोन्ही सामने जिंकून थेट क्वॉलिफाय होण्याची सुवर्णसंधी आहे, तर DC ला दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि त्याचबरोबर MI च्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News