आयपीएलमध्ये आज राजस्थान Vs सीएसके सामना; पॉईंट्स टेबलवर काय परिणाम होणार?

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि सीएसके सामना होणार आहे. पॉईंट्स टेबलवर काय परिणाम होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊ

आयपीएल 2025 च्या हंगामातील एक औपचारिक सामना आज होत आहे. आयपीएल 2025 स्पर्धेतील 62वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघाच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र शेवटच्या टप्प्यात दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.

कोणता संघ जिंकेल?

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ गुणतालिकेत अगदी तळाशी आहेत. राजस्थान रॉयल्सने 13 सामने खेळले असून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शेवटचा सामना आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात फक्त 3 विजय मिळाले आहेत. तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्स 6 गुण आणि -0.701 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेतील 13वा सामना खेळणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 3 सामन्यात विजय आणि 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. चेन्नई सुपर किंग्स 6 गुण आणइ -0.992 नेट रनरेटसह सर्वात शेवटी म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे.

संघाचे प्लेइंग 11 कसे?

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), नूर अहमद, आयुष म्हात्रे, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, खलील अहमद, मथिशा पाथिराना.

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, क्विन म्फाका, तुषार देशपांडे, शुभम दुवाल, आकाश मध.


About Author

Rohit Shinde

Other Latest News