Prakash Abitakar : कोरोनाचे दोन संशयित रुग्ण मुंबईतील के ई म रुग्णालयात सापडले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामुळे जर कोरोनाचे रुग्ण आढळले किंवा कोरोना वाढला तर कशाप्रकारे याला सामोरे जायचं आणि याची तयारी काय आहे? यावर आज आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते.
आपली प्रतिकार शक्ती वाढली आहे…
दरम्यान, माझी विनंती आहे की, कोरोना आपल्याबरोबर आहे. घाबरण्याचे कारण नाही पण आपली रोग प्रतिकार शक्ती वाढली आहे. त्यामुळे कोरोना आपल्या सोबतच आहे. आपल्याला आता कोरोनाचा धोका नाही. पंधरा-सोळा वर्षांपूर्वीच स्वाइन फ्लू होता.यानंतर कोरोना आला पण आता घाबरण्याची गरज नाही. करण आपली तशी सात रोगांसाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत. त्या आयडीएसपी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उपायोजना केले जात आहेत. त्यामुळे घाबराण्याचे कारण नाही. आपली आरोग्य यंत्रणा मजबूत आहे, असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यानी सांगितले.

केंद्र सरकारकडून सूचना जारी केल्या जातील…
दुसरीकडे कोणत्याही आजाराला त्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतात. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. त्यासाठी आत्ताच काहीतरी करायला हवं अशी स्थिती नाही. दुसरीकडे जे रुग्ण होते, ते कोरोणाचे नव्हते असे रुग्णालयाने म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकार या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. त्याबाबतची गरज भासली तर केंद्र सरकारकडून तशा सूचना जारी केल्या जातील. पण आता सध्या तरी तशी कोणतीही आवश्यकता नाही. प्रत्येक नागरिकाच्या सूचना आम्ही घेऊ आणि त्यानुसार काम करू, असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यानी सांगितले.