भारत-पाकिस्तान युद्धात पहिल्या दोन दिवसांतच भारताच्या शस्त्रास्त्रांची ताकद समोर आली आहे. भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची अस्त्रं निष्प्रभ ठरल्याचं पाहायला मिळालंय. एस 400 सिस्टिमने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल हवेतच नष्ट केलेत. एस 400 अर्थात सुदर्शन डिफेन्स सिस्टिम ठरली पाकिस्तानवर भारी ठरली आहे. अवघ्या एका सुदर्शनास्त्रच पाकिस्तान गारद झालं आहे. भारताकडे असलेली इतर ब्रह्मास्त्र तर पाकला घाम फोडणारी आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय. ६ मेच्या रात्री केलेला एअर स्ट्राईक आणि ७ मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या आगळिकीला दिलेल्या उत्तरांत काहीच अस्त्र वापरण्यात आली. भारताच्या सुदर्शन चक्रासमोर पाकिस्तानची अस्त्र निष्प्रभ ठरली आहेत. एस 400 सिस्टिमने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल हवेतच नष्ट केले. पाकिस्तानचे सगळेच हल्ले एका सुदर्शन डिफेन्स सिस्टिमनं मोडून काढले आहे. सुदर्शन चक्र ही तर झाकी आहे, ब्रह्मास्त्र अभी बाकी आहे, असं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतायेत. कारण एस-400 सारखी आणि त्याहून अधिक भेदक मारा करणारी अस्त्र भारताकडे आहेत. त्याच्या मदतीने भारत मोठ्यातील मोठी हल्ले परतवून लावू शकतो.

भारताकडे कोणती अस्त्र?
1. ब्रह्मोस – 450 ते 800 किमीपर्यंत अचूक मारा करणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल जमीन, समुद्र किंवा हवेतूनही ब्रह्मोस मिसाईल डागणे शक्य.
2.अग्नि – 5 हजार किमी रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल , भारताच्या कोणत्याही भागातून पाकिस्तानला टार्गेट करू शकतं.
3. पृथ्वी – 2000 किमी रेंज असलेलं न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल, निशाणा इतका अचूक की 10 मीटर आजूबाजूला असलं तरी लक्ष्य भेदतं.
4. शौर्य – 700 ते 800 किमी रेंजचं हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल, शौर्य मिसाईल अणुहल्लाही करू शकतं.
5.प्रहार – 150 किमी रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल, वेगवेगळ्या दिशांना काही लक्ष्य भेदू शकते.
6. आकाश – फायटर जेटला हवेत उडवण्याची क्षमता असलेलं मिसाईल, एका युनिटमध्ये चार मिसाईल, रेंज 80 किलोमीटर.
7. धनुष – जमिनीपासून हवेत मारा करणारं बॅलिस्टिक मिसाईल, जमीन आणि पाण्यात हल्ल्यासाठी सक्षम
8. निर्भय – दिशा चूकवून टार्गेट करू शकणारी क्रूझ मिसाईल, 1500 किमी रेंज असलेलं मिसाईल शत्रू आणि रडारलाही चकवा देतं.
9. सागरिका – 750 किमी रेंज असलेली बॅलिस्टिक मिसाईल सिस्टिम, नेव्हिगेशन सिस्टिमच्या आधारे अचूक लक्ष्य भेदते.
10. अमोघ – अंधारातही लक्ष्य भेदणारं मिसाईल, 2500 मीटर रेंज असलेलं मिसाईल अंधारात टार्गेट ओळखून नष्ट करतं.
भारतानं इस्रायल बनावटीच्या हारोप ड्रोनच्या सहाय्यानं पाकिस्तानच्या ९ शहरांत केलेल्या ड्रोन हल्ल्यानं पाकिस्तान गर्भगळीत झालंय. या हारोपपेक्षाही जास्त क्षमता असलेले ड्रोन आणि रॉकेट लाँचर भारताकडे आहेत.
भेदक ड्रोन आणि लाँचर
१. पिनाका – मोठ्या क्षेत्राचं नुकसान करु शकणारं स्वदेशी बनावटीचं रॉकेट लाँचर, ९० किमी अंतरावर अचूक माऱ्याची क्षमता मारा केल्यानंतर तातडीनं लोकेशन बदलतं.
2. स्कायस्ट्रायकर – शत्रूंच्या ठिकाणांवर दीर्घकाळ राहून अचूक भेद करणारं ड्रोन, बंकर, कमांड सेंटर आणि इतर टार्गेटवर मारा करण्याची क्षमता
गुरुवारी संध्याकाळी कराची बंदरावर आयएनएस विक्रांतनं मिसाईल डागून कवळ एक ट्रेलर दाखवलंय. आयएनएस विक्रांतची क्षमता अचंबित करणारी आहे.
आयएनएस विक्रांतची क्षमता
1 विमान वाहून नेण्याची क्षमता असलेली प्रचंड मोठी युद्धनौका
2. फ्लाईट डेस्क दोन फुटबॉलच्या मैदानांइतका
3 युद्धनौकेवर 1700 क्रू मेंबर्स
4 आयएनएस विक्रांतची लँडिंग स्ट्रीप 12500 चौरस मीटर
5 युद्ध नौकेवर हवेत मारा करणाऱ्या 64 बराक मिसाईलची तैनाती
6 3000 फायर सेन्सर, 750 फ्लड सेन्सर, 8 पॉवर जनरेटर
7 एकाचवेळी 30 युद्ध विमानांच्या लँडिंगची क्षमता
8 मिग 29 फायटर जेट आणि हेलिकॉप्टर्सची तैनाती
9 युद्ध नौकेवर अद्ययावत आयसीयू, प्रयोगशाळाही