गेल्या चार दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने पाकिस्तान आणि एलओसीजवळील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. भारतातील नागरिकांच्या जीवावर आलं तर भारतीय सैन्य त्याला सडेतोड उत्तर देईल असं सशस्त्र दलाच्या पत्रकार परिषदेतही सांगण्यात आलं होतं. भारत पाकिस्तानमधील तणाव पाहता देशातील सर्व सुरक्षा दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सर्वांना ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश आहेत.
लग्नाच्या चार दिवसांनी आला फोन, अंभोरे तातडीने ड्यूटीवर
काही अधिकारी कुटुंबासोबत काही क्षण घालवण्यासाठी घरी आले होते. मात्र त्यांनीही देशप्रथम मानल तातडीने ड्यूटीवर रवाना झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांच मोठं कौतुक होत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी या जवानांनी नवा संसार सुरू केला होता. मात्र सीमेवरुन बोलावणं आलं आणि हे सैनिक ड्यूटीवर हजर राहायला तयार झाले. वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावातील कृष्णा राजू अंभोरे यांचं चार दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र सैन्याकडून आदेश मिळाल्यानंतर ते तातडीने रवाना झाले.

घरात लग्नानंतरची सत्यनारायण पूजा, पण देशसेवेसाठी जवान ड्यूटीवर रवाना
जळगावातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. येथील पाचोरामधील नवविवाहित मनोज पाटील यांचाही ५ मे रोजी लग्न झालं होतं. ज्या दिवशी सत्यनारायण होता. त्याच दिवशी त्यांना ड्यूटीवर हजर राहण्यासाठी फोन आला. मग काय सत्यनारायण सोडून देशसेवेसाठी रवाना झाले. त्यांच्या पत्नीनेही पतीचं कौतुक केलं आहे. आपला पती देशसेवा करतो. सद्याच्या परिस्थितीत त्यांनी ड्यूटीवर असायला हवं अशी भावना तिने व्यक्त केली.
ही दोन्ही उदाहरणं देशाप्रती तत्परता, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेची उदाहरणं आहेत. पाटील असो वा अंभोरे यांच्याासारखे हजारो जवान आज आपल्या सुरक्षिततेसाठी सीमेवर लढा देत आहे. देशाची मान झुकू नये यासाठी ते ताठ कणा ठेवून दिवस-रात्र पहारा देत आहेत. शत्रूकडून आलेले हल्ले मोठ्या धाडसाने परतवून लावत आहे. देशहित, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा मनात ठेवत देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढा देणाऱ्या सर्व सैनिकांना MP मराठी ब्रेकिंग न्यूजकडून कडक सॅल्यूट.