Eknath Shinde – मुंबईत ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि २०१७ ते २०२२ या कालावधीत उबाठा गटाचे नगरसेवक राहिलेले हर्षद प्रकाश कारकर यांनी सपत्नीक दिक्षा हर्षद कारकर यांच्यासह आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील टेंम्बवलकर, शिवसेना महिली आघाडीच्या विभागप्रमुख मीना पानमंद हेदेखील उपस्थित होते.
योजनांमुळे राज्यात नवसंजीवनी मिळाली…
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्ते, वाहतूक, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी राबवलेल्या योजनांमुळे राज्यात नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कामामुळे लोकांचा शिवसेनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. शिवसेनेचे आणखी बळ वाढले आहे.

विकासाभिमुख कार्याला नवी दिशा…
आज पक्षप्रवेश केलेल्या दिक्षा कारकर या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून सध्या महिला आघाडीच्या उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, तसेच आजी-माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील शिवसेना संघटनात्मक पातळीवर अधिक बळकट होईल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.