हृदयाशी संबंधित आजारांमागे अनेक कारणे असू शकतात, ज्यात उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह इत्यादींचा समावेश आहे. कधीकधी तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसलात तरीही हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का की तणावामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यासारखे आजार देखील होऊ शकतात? मानसिक तणावामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, कारण तणावामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्तातील चरबी वाढते.
मानसिक ताण आणि हृदयविकार
मानसिक ताण आणि ब्रेन स्ट्रोक
स्ट्रोक म्हणजे मेंदूला होणारा रक्त प्रवाह किंवा मेंदूमध्ये अचानक रक्तस्त्राव यामुळे होतो. अनेक गोष्टी स्ट्रोकचा धोका वाढवतात, त्यापैकी एक म्हणजे मानसिक ताण. मानसिक तणाव मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण वाढवतो, ज्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना मानसिक ताण तणाव जास्त जाणवतो. याचा गंभीर परिणाम होऊन मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. यालाच ब्रेन स्ट्रोक असं म्हणतात. जर उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असल्यास ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणं
- अचानक बोलतांना शब्द योग्यरित्या उच्चारण्यास किंवा इतरांचे बोलणे समजण्यास त्रास होऊ शकतो.
- शरीराच्या एका बाजूला चेहरा, हात किंवा पायांवर कमजोरी जाणवू शकते किंवा ते सुन्न होऊ शकतात.
- अचानक खूप डोकेदुखी आणि त्याच्याबरोबर उलटी, चक्कर, आणि बेशुद्ध होण्याची शक्यता आहे.
- चालताना संतुलन बिघडणे किंवा पाय उचलण्यास त्रास होणे.
- अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणे.
ब्रेन स्ट्रोकची ही लक्षणं अचानक दिसू शकतात, त्यामुळे या लक्षणांना वेळीच ओळखणे आणि त्वरित डॉक्टरांना भेटणे अत्यंत आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)