बीडीडीवासियांना हक्काची घर मिळावीत यासाठी आम्ही वारंवार प्रयत्नशील आहोत – आदित्य ठाकरे

डीडी चाळीतील रहिवाशांना चांगली घरं मिळावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. लोंकाना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. मात्र सरकारने दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. सरकार लोकांची दिशाभूल करत आहे.

Adktya Thackeray – मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाचा म्हाडा आणि टाटा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम २०२१ पासून सुरू आहे. आम्ही सातत्याने या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत असतो. आज प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली. याप्रसंगी स्थानिक विभागप्रमुख आशिष चेंबूरकर उपस्थित होते.

काम चांगल्या मार्गावर सुरू…

दरम्यान, म्हाडाला प्रकल्पाबाबतची माहिती नियमितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. ते म्हणाले, “लोकांच्या मनात या प्रकल्पाबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे म्हाडाने दर तीन महिन्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती लोकांना द्यावी. लोकांना त्यांची घरे कशी असतील, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आणि संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. आम्ही विरोधात असलो तरी या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारला पूर्ण सहकार्य करत आहोत. हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, अशी आमची इच्छा आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारच्या आश्वासनांवर टीका…

सरकारने दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. आम्ही सरकारची खोटी आश्वासने लोकांसमोर आणत आहोत. “सरकारने या प्रकल्पातील घरांचे हस्तांतरण डिसेंबरमध्ये होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत घरे मिळतील, असे सांगितले. मात्र,सरकारवर खोटी आश्वासने दिल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. लोकांना त्यांची हक्काची घरे लवकर मिळावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे आदित्य ठाकरे म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News