मुंबई – मे महिन्यात उन्हाच्या झळांना आणि अवकाळी पावसाला सामोऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांना रविवारी मेगाब्लॉकचा सामनाही करावा लागणार आहे. रविवारी ११ मे रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री काही काळ मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर माहीम तके सांताक्रूझ दरम्यान शनिवारी रात्रकालिन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या काही सेवांवर परिणाम होणार आहे.

कुठे कुठे असेल मेगाब्लॉक
१. मध्य रेल्वे
माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक
वेळ सकाळी 11.05 ते दुपारी 3.45
मार्ग – अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर
जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकलच्या फेऱ्या रद्द
2. हार्बर रेल्वे
कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक
वेळ- सकाळी 10.40 ते दुपारी 4.40
मार्ग – अप आणिडाऊन दोन्ही मार्गांवर
सीएसएमटी ते पनवेल-वाशीच्या काही लोकल सेवा रद्द होणार, काही स्पेशल लोकल सोडल्या जातील
पश्चिम रेल्वे
माहीम ते सांताक्रूझ दरम्यान मेगाब्लॉक
वेळ- शनिवारी रात्री 1 ते पहाटे 4.30 पर्यंत
मार्ग- अप आणि डाऊन मार्गावर
रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील, रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही.
घरातून बाहेर पडताना काळजी घ्या
रविवारी मेगाब्लॉक असल्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. उन्हाळा आणि अवकाळी पाऊस याचाही विचार घरातून निघताना करण्याची गरज आहे.