मेटाकडून व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने उत्तम फीचर्सचा भरणा भरला जात आहे. यामुळे, व्हॉट्सअॅप वापरण्याचा युजर्सचा अनुभव आणखी चांगला झाला आहे. आता अशातच, मेटा व्हॉट्सअॅपमध्ये दोन नवीन एआय आधारित फीचर्स आणणार आहे.
या फीचर्सबद्दलची माहिती WhatsApp च्या बीटा व्हर्जनमधून समोर आली आहे. या नवीन फीचर्सच्या मदतीने युजर्स त्यांच्या मेसेजेसना सहजपणे मॅनेज करू शकतील आणि आपल्या चॅट्सला आपल्या पसंतीनुसार कस्टमाइजही करू शकणार आहेत. चला तर मग या फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
*मेसेज समरायझेशन फीचर*
अनेकदा असे होते की तुम्ही WhatsApp वर अॅक्टिव्ह नसताना ग्रुपमध्ये दीर्घ संवाद चालू असतो. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही त्या मेसेजेसकडे पाहता, तेव्हा संपूर्ण संभाषण समजून घेणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरते. मग संपूर्ण संवाद जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मेसेज एक-एक करून वाचावे लागतात. या समस्येवर उपाय म्हणून WhatsApp मॅसेज समरायझेशन फीचर आणत आहे.
*हे फीचर कसे कार्य करेल?*
हे फीचर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅट्समध्ये Summarise with Meta AI हा पर्याय दिसेल. हा पर्याय फक्त तेव्हाच दिसेल, जेव्हा तुम्ही एखाद्या चॅटमधील अनेक मेसेजेस वाचलेले नसतील. या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण चॅटचा सारांश वाचायला मिळेल.
अशा स्थितीत तुम्हाला प्रत्येक मेसेज एक-एक करून वाचण्याची आवश्यकता नसेल आणि तुम्ही कमी वेळात संपूर्ण चॅट समजू शकाल. Meta च्या म्हणण्यानुसार, हा फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनला सपोर्ट करेल. म्हणजेच AI जेव्हा मेसेजेसची समरी तयार करेल, तेव्हा यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा पूर्णपणे संरक्षित राहील.
*AI वॉलपेपर*
यानंतर दुसरा फीचर AI आधारित वॉलपेपर तयार करण्याचा आहे. हे Meta AI च्या मदतीने कार्य करेल. यामुळे युजर्सना त्यांची चॅट बॅकग्राऊंड पर्सनलाइज करण्याची सुविधा मिळेल. हे फीचर आल्यानंतर WhatsApp च्या वॉलपेपर सेटिंग्स मेन्यूमध्ये Create with AI हा नवीन पर्याय दिसेल.
*हे फीचर कसे कार्य करेल?*
या फीचरसह, युजर्स आपला आवडता सीन किंवा स्टाइल टेक्स्टमध्ये डिस्क्राइब करून Meta AI कडून त्यांचा आवडता वॉलपेपर तयार करून घेऊ शकतील. एआय तुम्ही दिलेल्या टेक्स्टच्या आधारे अनेक वॉलपेपर ऑप्शन्स प्रदान करेल. या फीचरच्या मदतीने चॅट्सला अधिक क्रिएटिव्ह आणि पर्सनलाईज बनवण्याची संधी मिळेल.