Mothers Day 2025 : मदर्स डेला आईला गिफ्ट द्यायचंय? या भन्नाट वस्तू ऑर्डर करा, १५ ते २० मिनिटात घरी येतील

आईला छोटीशी मदत केली तरीही ती खूश होते. मात्र यंदाच्या मदर्स डे निमित्त तिला काहीतरी भेटवस्तू देऊ पाहा, तिच्या आनंदात अधिक भर पडेल एवढं नक्की.

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. या वर्षी ११ मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. मदर्स डेच्या निमित्ताने प्रत्येक लेकराची हीच इच्छा असते, किमान या दिवशी तरी आपल्या आईच्या चेहऱ्यावर हसू उमटावे आणि हा दिवस आईसाठी खास बनवावा.

मग यासाठी कुणी तिच्यासाठी काहीतरी स्वादिष्ट जेवण बनवतो, तर कुणी तिला फिरायला घेऊन जातो. सोबतच अनेकजण मदर्स डेनिमित्त आईसाठी खास भेटवस्तूही खरेदी करतात. अनेकजण तर काही दिवस आधीपासूनच आईसाठी गिफ्ट्स मागवून ठेवतात. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो, की आपल्यासाठी कोणते गिफ्ट खरेदी करावे, जेणेकरून आईला ते तिच्या रोजच्या जीवनात वापरता यावे आणि त्याच्या वापरातून रोजचे कामही हलके व्हावे.

पण जर तुम्ही अजूनपर्यंत आईसाठी कोणतीही भेटवस्तू घेतली नसेल, तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण सध्या ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्स अतिशय जलद डिलिव्हरी सेवा देतात.

अनेकदा १५ ते २० मिनिटांत किंवा फारतर १-२ तासांमध्ये वस्तू तुमच्या घरपोच मिळतात. अशा परिस्थितीत, आज आपण जाणून घेऊया की मदर्स डे निमित्त कोणकोणत्या भेटवस्तू तुम्ही तुमच्या आईला देऊ शकता. हे लास्ट मिनिट गिफ्ट आयडियाज तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणतील.

मदर्स डे लास्ट मिनिट गिफ्ट आयडियाज

वॉलेट

आईला एखाद्या चांगल्या ब्रँडचे सुंदर वॉलेट भेट म्हणून दिले जाऊ शकते. रंग आणि डिझाइन तुम्ही आईच्या आवडीनुसार निवडू शकता. हे वॉलेट आईच्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल आणि तिला नक्कीच आवडेल.

बाथ सेट

सध्या अनेक ब्रँड्सचे बाथ सेट्स ऑनलाईन चांगल्या किमतीत उपलब्ध आहेत. या सेटमध्ये शॉवर जेल, बॉडी ऑइल, मॉइश्चरायझर आणि बॉडी स्क्रब यांचा समावेश असतो.
तुमच्या बजेटनुसार बाथ सेट निवडून आईला एक हटके गिफ्ट देऊ शकता.

रूम फ्रॅग्रन्स सेट

फक्त रूम फ्रेशनरच नव्हे, तर आजकाल इन्सेन्स स्टिक्स, सुगंधी मेणबत्त्या, अरोमा ऑइल्स आणि डिफ्यूझर्स यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे घरात प्रसन्नता आणि शांतता निर्माण करतात. आईच्या आवडीनुसार एखादं सुगंधी सेट निवडा. ही एक खास भेट ठरेल.

ज्वेलरी किंवा घड्याळ

आईसाठी एखादी छान आर्टिफिशियल ज्वेलरी, ब्रँडेड घड्याळ, पेंडंट, इयरिंग्स, बांगड्या किंवा एखादी परंपरागत नेकपीस ऑनलाइन सहजपणे खरेदी करता येईल. ही एक हृदयस्पर्शी भेट ठरेल, जी आई जपून अनेक वर्षे ठेवेल.

किचन गॅजेट

आईच्या रोजच्या कामात मदत करणारे कोणतेही किचन गॅजेट किंवा युटेन्सिल्स (भांडी) एक परिपूर्ण भेट ठरू शकते.
जर तुमच्या आईला कॉफीची आवड असेल, तर कॉफी मेकर द्या. जर ती चहा प्रेमी असेल, तर विविध प्रकारचे टी बॅग्स घेऊन तिला काहीतरी नवीन टेस्ट करण्याची संधी द्या.

टेक गॅझेट्स

मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईला काही टेक गॅझेट्सही भेट देऊ शकता.

यात तुम्ही तिला ईयरबड्स, स्मार्ट वॉच, हेअर ड्रायर, फोन चार्जर / पावर बँक, इलेक्ट्रिक हँड फॅन, ब्लूटूथ स्पीकर / रेडिओ, डिजिटल कॅमेरा हे भेट देऊ शकता. या गिफ्ट्समुळे आईचा वेळ छान जाईल आणि तिला काही नवीन व उपयोगी गोष्टींचा अनुभव घेता येईल.


About Author

Smita Gangurde

Other Latest News