मंबई – मुंबईसह महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास पोहोचलेला आहे. अशात एसीशिवाय ऑफिस किंवा घरात थांबणं अवघड आहे. सतत एसीत राहण्याची सवय झाल्यानं, उन्हाच्या वेळात प्रवासासाठी बाहेर पडलं तरी त्याचा त्रास अनेकांना होतोय. हा त्रास टाळण्यासाठी एसी लोकल, मेट्रो सारख्या पर्यायांची निवडही अनेक जणं करतायेत.
अशात एसी जास्त वेळा चालवण्यात येत असल्यानं वाढणारं लाईट बिल हाही अनेकांच्या चिंतेचा विषय आहे. एसी वापरताना तो किती वेळ चालवावा, याची अद्यापही अनेकांना कल्पना नसल्यानं त्याचा फटका महिन्याला आलेल्या लाईट बिलात अनेकांना बसलेला पाहायला मिळतोय.

एसी वापरण्याच्या काही टिप्स
विनाकारण एसी वापरु नका
एसी तीनतास चालू ठेवणं हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. यातून एसी ओव्हर हिटिंग होण्याची समस्याही उद्भवू शकते. घरात परतल्यानंतर खोली गार राहावी म्हणून एसी चालू ठेवून दोत तीन तास बाहेर जाणारेही महाभाग आहेत. मात्र एसीचा असा अतिरिक्त वापर केल्यास विनाकारण ऊर्जा खर्ची पडते, हे जाणून घेण्याची गरज आहे.
एसी किती वेळ वापराल
तुमच्या खोलीच्या आकारमानावर आणि एसीच्या क्षमतेवर हे गणित अवलंबून आहे. खोली लहान असेल आणि तुमच्याकडे 1 टनचा एसी असेल तर काही वेळातच खोली थंडगार होईल. त्यानंतर काही काळासाठी एसी बंद करण्याचा पर्यायही तुमच्याकडे असेल. खोली मोठी असेल आणि 1 टनचा एसी असेल तर 7 ते 8 तास एसी वापरावा. त्यानंतर काही काळासाठी एसी बंद करण्याची गरज आहे.
तुमची खोली मोठी असेल आणि तुमच्याकडे 1.5 किंवा 2 टनचा एसी असेल तर 12 तास एसी चालवता येऊ शकतो. मात्र त्यानंतर काही काळासाठी एसीला विश्रांती देण्याची गरज आहे.
एसीचं तापमान किती असावं
उन्हाळ्यात बाहेरचं तापमान 40 अंशांवर असताना, खोलीत 25 ते 30 अंश तापमान असणं आवश्यक आहे. यासाठी एसी 22 डिग्रीवर चालवावा. रात्रीच्या वेळी खोली गार झाल्यानंतर उशिरा एसी बंदही करण्याचा पर्याय आहे.