‘आईचं हसू म्हणजे आयुष्याचा साज’, या सुंदर संदेशाने आईला द्या मदर्स डेच्या शुभेच्छा

आईचे प्रेम ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. स्वतःला विसरून ती तिच्या मुलाचे संगोपन करते. ती त्याच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रार्थना करते.

Mother’s Day Wishes Marathi:   दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. प्रत्येक आईच्या निस्वार्थ प्रेमाचा, सेवेचा आणि प्रेमाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी मदर्स डे ११ मे २०२५ रोजी आहे. या खास प्रसंगी, मुले त्यांच्या आईसाठी प्रेमळ भेटवस्तू किंवा भावनिक संदेश तयार करतात.

मदर्स डे स्पेशल-

अनेक लोक सोशल मीडिया, कार्ड आणि मेसेजद्वारे त्यांच्या आईंना ‘मदर्स डेच्या शुभेच्छा’ देतात. जर तुम्ही तुमच्या आईसाठी उत्तम कविता, कोट्स आणि प्रतिमा शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि हृदयस्पर्शी संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीसोबत शेअर करू शकता.

 

मदर्स डे शुभेच्छा-

जीवनातील पहिली शिक्षकआणि मैत्रीण आई असते
आपलं जीवन पण आईच
कारणआपल्याला जीवन देणारी आईच असते
हॅप्पी मदर्स डे!

आई म्हणजे..आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी
मातृदिनाच्या शुभेच्छा!

आईचं हसू म्हणजे आयुष्याचा साज,
तिच्याशिवाय अधुरं वाटतं प्रत्येक आज.
आईविना जीवन असते नीरस,
आनंदाने साजरा करू मातृत्वाचा दिवस.
हॅप्पी मदर्स डे!

निस्वार्थपणे आई करते बाळावर माया,
आयुष्यभर असते तिची आपल्यावर छाया.
अश्या या प्रेमळ आईला
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हसरा चेहरा बघून तिचा, होतो मनाला हर्ष,
तिचं प्रेम करते मनाला स्पर्श.
तिच्या स्पर्शाने मिटतात साऱ्या व्यथा,
आई म्हणजे देवतेची प्रचीती जगता.
अश्या माझ्या निर्मळ आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जिंकलो मी, तू दिलीस मायेंची थाप,
आई तुझ्या प्रेमाला नाही मोजमाप.
माझ्या प्रेमळ आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुखी जीवनाचं रहस्य
आईच्या चेहऱ्यावर उमलणारं हास्य!
आई हीच खरी संपत्ती,
जिच्यामुळे मिळते आपुलकीची ओलसर सत्ती।
हॅप्पी मदर्स डे!

तुझ्या आशीर्वादाने घेतो मी यशाची उंच भरारी,
तू देवी आहेस, नाहीस सामान्य नारी.
माझ्या जीवनातल्या अनमोल व्यक्तीस
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईच्या कुशीत मिळतो विसावा,
तिच्या हास्याने उजळतो दाराचा उजेड सारा.
तुला मातृदिन निमित्य हार्दिक शुभेच्छा आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जिच्या कृपेने मिळालं हे जीवन,
त्या माऊलीला या मातृदिनाच्या निमित्य शतदा नमन।
मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा!


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News