Rice Cutlet: उरलेला भात फेकून देता? आता भातापासून बनवा चविष्ट कटलेट, पाहा रेसिपी

Rice Cutlet Recipe: उरलेल्या भातापासून बनवा चविष्ट कटलेट, पाहा साहित्य आणि रेसिपी

How to Make Rice Cutlets:  प्रत्येक घरात काही जादाचे अन्न शिजवले जाते. अशा परिस्थितीत, तुमच्या घरात उरलेल्या अन्नाचे तुम्ही काय करता? जर तुम्ही ते फेकून देत असाल तर थांबा… कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही रेसिपी सांगणार आहोत ज्या जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जर तुमच्याकडे उरलेला भात असेल आणि त्याचे काय करायचे असा प्रश्न पडत असेल तर तो फेकून देऊ नका. फक्त काही भाज्या आणि मसाले घाला आणि कुरकुरीत चवदार भाताचे कटलेट बनवा. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि रेसिपी…

साहित्य-

-उरलेला भात – २ कप
-उकडलेले बटाटे २
-कांदा – २ बारीक चिरलेला
-लाल तिखट – ½ टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
-हिरव्या मिरच्या – १-२ (बारीक चिरलेल्या)
-हिरवी कोथिंबीर – थोडी (बारीक चिरलेली)
-आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
-मीठ – चवीनुसार
-बेसन किंवा ब्रेडक्रंब – २ टेबलस्पून
-तेल – तळण्यासाठी

रेसिपी-

स्टेप १-
उरलेल्या भाताचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदूळ, कुस्करलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सर्व मसाले घाला.

स्टेप २-
हे सर्व मिश्रण चांगले मिसळा. तयार मिश्रण खूप पातळ असेल तर ते घट्ट करण्यासाठी बेसन किंवा ब्रेडक्रंब घाला.

स्टेप ३-
आता तयार मिश्रणाचे तुमच्या आवडीच्या आकारात (गोल किंवा अंडाकृती) कटलेट बनवा.

स्टेप ४-
नंतर एका कढईमध्ये थोडे तेल गरम करा आणि कटलेट्स मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.

स्टेप ५-
तुमचे कुरकुरीत आणि स्वादिष्ट भाताचे कटलेट सर्व्ह करण्यासाठी एकदम तयार आहेत.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News