नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊले उचलत पाच मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारताकडून करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईनंतर आज (गुरुवार) पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांच्या तीनही दलाचे लष्करप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीनंतर पाकिस्तानकडून सांगण्यात आले की, भारताने सिंधूचे पाणी आडवणे म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन. सिंधूचे पाणी हे 24 कोटी पाकिस्तानी नागरिकांचे जीवन आहे आणि त्याचे संरक्षण कोणत्याही परिस्थितीत केले जाईल. भारताकडून या जल करारला स्थगिती म्हणजे Act Of War समजले जाईल, असे सांगण्यात आले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घोषणा
वाघा सीमा बंद करण्याची घोषणा
सर्व भारतीयांना ३० एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे आदेश
SAARC अंतर्गत जारी केलेले सर्व भारतीय व्हिजा रद्द
पाकिस्तानमधील भारतीयांना 48 तासांत देश सोडण्याचे निर्देश
सर्व द्विपक्षीय करार स्थगित
शिमला करार रद्द
हवाई क्षेत्र भारतासाठी बंद
भारतासोबतचा सर्व व्यापार बंद, तिसऱ्या देशाच्या माध्यमातून होणारा व्यापारही बंद
भारताकडून पाकिस्तानवर लादण्यात आलेले निर्बंध
सिंधू जल करार स्थगित
पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजा सेवा बंद
व्हिजावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश
वाघा बॉर्डर बंद करण्याची घोषणा
भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद .