‘देश शक्तिशाली आहे हे दाखवण्याची वेळ आलीये’, पहलगाम आंतकवादी हल्ल्यावर मोहन भागवतांनी ठणकावले

पहलगाम हल्लाविषयी आज सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारडून कुठे तरी चूक झाली, याची कबुली दिली.

मुंबई : पहलगाम आंतकवादी हल्ल्यामध्ये भारतीय पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला. या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंमसेवक संघचे प्रमुख मोहन भागवन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. देश शक्तिशाली आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे. काही लोक सुधारत नाही त्यांना शिक्षा करावीच लागते, असे भागवत म्हणाले.

रावण हा शिवभक्त होता. मात्र त्याची बुद्धी बदलायला तयार नव्हती. रावणाने सुधारायला पाहिजे म्हणून रामने त्याचा वध केला. असे काही लोक असतात त्यांना समजाऊन काही फायदा नसतो. त्यांना धडा शिकवावा लागतो. मला अपेक्षा आहे लवकरच हे होईल, असे  मोहन भागवन म्हणाले.

हिंदू अस कधीच करणार नाही…

मोहन भागवत म्हणाले, ही जी लढाई आहे ती पंथसंप्रदायाची नाही. ही लढाई ही धर्मा धर्माची लढाई आहे. आपल्या जवानांनी कधी धर्म विचारून मारलं नाही. हिंदू अस कधीच करणार नाही. काल कट्टरपंथीयांनी ते केलं धर्म विचारून मारलं. आपल्या संप्रदायाचा चुकीच अर्थ लावणारे कट्टर पंथीय असे करतील. म्हणून देश बलवान पाहिजे.

सर्वपक्षीय बैठक संपन्न

पहलगाम हल्लाविषयी आज सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारडून कुठे तरी चूक झाली, याची कबुली दिली. तर विरोधी पक्षांकडून सरकार दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे म्हटले. राहुल गांधी यांनी सांगितले की, सरकारजी कारवाई करेल त्याला समर्थन असेल.

 

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News