दिल्ली : पहलगाम हल्लाच्या संदर्भात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारकडून माहिती देण्यात आली. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी म्हणाले, पहलागमध्ये झालेल्या भ्याड हाल्ल्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने कुठलाही निर्णय घेतला तरी आम्ही त्याच्या मागे ठामपणे उभे असू. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. ते म्हणाले सरकारच्या सर्वप्रकारच्या कारवाईला आमचे समर्थन आहे.

सीमेपार असलेले दहशतवादी तळ नष्ट करा
सर्वपक्षीय बैठकीत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत हल्ल्याचा तीव्र निषेध केला. द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी सांगितले की, आज सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि तिचे अध्यक्षस्थान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते… द्रमुकच्या वतीने, मी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनात चिंता व्यक्त केली आणि पहलगाममध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला.
ठाकरे गटाच्या नेत्यांची अनुपस्थित
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणीही उपस्थित नव्हते.यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले, त्याचे नेते आज दिल्लीत होते.पण कदाचित सर्वपक्षीय बैठकीव्यतिरिक्त त्यांचे काही महत्त्वाचे काम असेल. इतक्या मोठ्या घटनेनंतर त्यांचे नेतेही (उद्धव ठाकरे) आज महाराष्ट्रात नाहीत. मला वाटते की पूर्वी पाकिस्तानवर हवाई हल्ले करून ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले होते. मला वाटते की आता पाकिस्तानला त्याची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.