राजस्थानचे आव्हान संकटात! आरसीबी विरुद्ध दारुण पराभव

राजस्थानकडून पुन्हा एकदा 14 वर्षीय वैभव सुर्यवंशी यशस्वी सोबत ओपनिंगला आला. त्याने 12 चेंडून 16 रन्स केले. त्यामध्ये त्याने दोन सिक्स देखील लगावले. मात्र, भुवनेश्वरच्या बाॅलिंगवर तो आऊट झाला.

बेंगळुरू : राजस्थान राॅयल विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगळुरू झालेल्या सामन्यात राजस्थान पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. आत्तापर्यंत नऊ पैकी सात सामन्यात राजस्थानला पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे यंदाच्या आपीएलमधील आव्हान धोक्यात आले आहे. आरसीबीने राजस्थानचा 11 धावांनी पराभव केला.

प्रथम बॅटींगसाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली. मात्र, फिल साॅल्ट हा 26 धावांवर हेटमायरकडे कॅच देऊन आऊट झाला. त्यामुळे आरसीबीची अवस्था एक आऊट 61 अशी होती.

पडीक्कल-कोहलीची टोलेबाजी

पहिला विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 42 बाॅल्समध्ये आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 70 धावा केला. तर, पडिकल्लने 27 बाॅल्समध्ये 50 धावा केल्या. टीम डेव्हिड 23 तर जितेश शर्मा 20 रन्स करू शकले.

राजस्थानकडून पुन्हा निराश

राजस्थानकडून पुन्हा एकदा 14 वर्षीय वैभव सुर्यवंशी यशस्वी सोबत ओपनिंगला आला. त्याने 12 चेंडून 16 रन्स केले. त्यामध्ये त्याने दोन सिक्स देखील लगावले. मात्र, भुवनेश्वरच्या बाॅलिंगवर तो आऊट झाला. यशस्वी जयस्वाल याने 19 बाॅल्समध्ये 49 रन्स केले. त्याच्या आक्रमक सुरुवातीमुळे राजस्थान विजय मिळवेल अशी अपेक्षा होती मात्र, मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी निराश केला. राजस्थानला 194 धावांपर्यंत मजल मारता आली. आणि त्यांना 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News