Various papad recipes: उन्हाळा सुरु होताच महिला वेगवेगळे वाळवणाचे पदार्थ बनवण्याच्या तयारीला लागते. पावसाळ्यासाठी लोणच्यापासून ते विविध पापडांपर्यंत अनेक पदार्थ बनवून ठेवले जातात. यासाठी महिला सतत नवनवीन रेसिपी शोधत असतात. आज आपण पोह्यापासून बनणारे पापड पाहणार आहोत. पोह्यापासून पापड कसे बनवता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तुम्ही घरी सहजपणे पापड बनवू शकता. हे खायला तर खूप चविष्ट असतातच शिवाय बनवायलाही खूप सोपे आहेत. चला तर मग जाणून घेऊया पोह्यपासून बनणाऱ्या पापडाची रेसिपी.

* साहित्य-
-पोहे – १ किलो
-जिरे – २ टेबलस्पून
-कढीपत्ता – ४-५
-आंबट दही – १ कप
-मीठ – चवीनुसार
-हिरव्या मिरच्या – ३-४
-हिंग – १/४ टीस्पून
-साबुदाणा – १ कप
* पोह्याच्या पापडाची रेसिपी-
पोह्याचे पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
तसेच पोहे दह्यात घालून २ तास भिजत ठेवा.
आता साबुदाणा, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरे, हिंग आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
आता पोहे चमच्याच्या मदतीने चांगले बारीक करा. त्यानंतर पोह्यात साबुदाण्याचे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा.
नंतर पोह्याचे मिश्रण चकलीच्या साच्यामध्ये भरा किंवा हाताने प्लास्टिकच्या कागदावर इच्छित आकारात चकली बनवा आणि उन्हात वाळवायला ठेवा.
पापड २-३ दिवस उन्हात ठेवा. ते सुकण्यास जास्त वेळ लागू शकतो. ते सुकल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. अशाप्रकारे पोह्याचे खमंग पापड तयार आहेत.