उन्हाळ्यात, थंड आणि चविष्ट पदार्थांची तीव्र इच्छा होते. अशा परिस्थितीत, चॉकलेट चिकू मिल्क शेक हा एक उत्तम पर्याय आहे. हे मिल्कशेक केवळ चविष्टच नाही तर बनवायलाही खूप सोपे आहे. चिकू, हे एक गोड आणि पौष्टिक फळ आहे. त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. लहान मुलांना फळे, स्मूदी किंवा मिल्कशेक पिण्यास द्यावे. यामुळे मुलांना पोषण मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चिकू खाल्यानंतर आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. चला तर जाणून घेऊया चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी. घरी चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी चिकू, दूध, चॉकलेट सिरप आणि इतर साहित्य वापरले जाते. हे मिल्कशेक मुलांना खूप आवडते कारण ते चवदार आणि थंड असते.
चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- चिकू
- दूध
- चॉकलेट सिरप
- साखर
- बर्फ
- काजू
चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्याची पद्धत
चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चिकूची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा. एका मिक्सरच्या भांड्यात दूध, चिकूचे तुकडे, चॉकलेट सिरप, साखर आणि बर्फ टाका. सर्व साहित्य मिक्सरमध्ये चांगले मिक्स होईपर्यंत फिरवा. मिश्रण थंड झाल्यावर ते ग्लासमध्ये ओता आणि बर्फ टाका. काजू आणि बारीक चिरलेला चिकू घालून सर्व्ह करा. चॉकलेट चिकू मिल्कशेक मुलांसाठी तयार आहे.
