आदित्य तटकरेंना रायगडच्या झेंडावंदनाचा मान, भरत गोगावले रुसले; अमित शहांच्या स्नेहभोजन सार्थकी?

भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. नाशिकच्या पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांच्याकडे गेल्यात जमा आहे. त्यामुळे रायगडवरील दावा सोडण्यास एकनाथ शिंदे तयार नाहीत.

अलिबाग :  रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. पालकमंत्रिपदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यातच स्थगिती दिली होती. त्यामुळे पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना यापैकी कोणाचा दावा यावरून महायुतीत धुसफूस सुरू होती. पालकमंत्रिपदाचा तिढा अजून सुटला नसला तरी 1 मे रोजी रायगच्या जिल्हाचे ठिकाण असणाऱ्या अलिबागमध्ये झेंडावंदनाचा मान महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे.

आदिती तटकरे यांना झेंडावंदनाचा मान मिळाल्याने शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. तर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्रिपदावरून तटकरे आणि गोगावलेंना समान संधी मिळाली पाहिजे, असे सांगण्यात येत आहे.मात्र, तटकरेंन यांना झेंडावंदनाचा मान देत पालकमंत्रिपदासाठी त्यांची दावेदारी मजबूत असल्याचे मानले जात आहे.

अमित शाहांसाठींचे स्नेहभोजन सार्थकी?

गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी रायगड किल्ल्यावर कार्यक्रमासाठी आले होते. अमित शाह यांना त्यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. शहा यांनी हे आमंत्रण स्वीकारत ते तटकरेंच्या घरी गेले होते. त्यावेळी आदिती तटकरेंच्या पालकमंत्रिपदासाठी ही साखपेरणी असल्याची चर्चा होती. त्यात आता आदिती तटकरेंना झेंडावंदनाचा मान मिळाल्याने शाहांचे स्नेहभोजन सार्थकी लागल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचा पालकमंत्रिपदावर दावा कायम

रायगडमध्ये सर्वाधिक आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. नाशिकच्या पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांच्याकडे गेल्यात जमा आहे. त्यामुळे रायगडवरील दावा सोडण्यास एकनाथ शिंदे तयार नाहीत.

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News