जातीनिहाय जनगणनेबाबत अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘न्याय हक्क मिळवण्यासाठी…’

अजित पवार म्हणाले की, जातीनिहाय जनगणनेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सामजिक संस्थाकडून करण्यात येत होती. या मागणीमुळे अनुसूचित जाती आणि जमातीसोबत ओबीसी तसेच इतर समाज घटकांची संख्या समजेल.

पुणे : केंद्र सरकारच्या कॅबिनेटने आज जातीनिहाय जनगणता करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांनी ट्विटरद्वारे आपली या निर्णयावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

‘केंद्र सरकारचा जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून यामुळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करेल.’, असे विश्वाज अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व उपेक्षित घटकांच्या विकासासाठी अधिक निधी प्रदान करता येईल. त्यामुळेमागास समाजघटकांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं ध्येय अधिक वेगानं साध्य करता येईल, असा देखील विश्वास अजित पवारांन व्यक्त केला आहे.

सर्वांना समान संधी मिळेल

अजित पवार म्हणाले की, जातीनिहाय जनगणनेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सामजिक संस्थाकडून करण्यात येत होती. या मागणीमुळे अनुसूचित जाती आणि जमातीसोबत ओबीसी तसेच इतर समाज घटकांची संख्या समजेल. त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थित समजत नव्हती ती स्पष्ट होईल. हा निर्णय समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणारा ठरेल तसेच भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास आहे.

धनंजय मुंडेंकडून स्वागत

जातीनिहाय जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांनी मोदी सरकारचे निर्णयाचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळेच आता जातीनिहाय जनगणना होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण काढली. ते म्हणाले, लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब, यांच्यासह अनेक मान्यवर नेते, संस्था, संघटना आदींनी ही मागणी गेल्या अनेक दशकांपासून केलेली आहे. ही मागणी मान्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News