17 वर्ष भारतात राहिला, निवडणुकीत मतदानही केले; पाकिस्तानी नागरिकाची कबुली

ओसामाने दावा केली की त्याच्याकडे मतदानकार्ड,आधारकार्ड, रेशनकार्ड आहे. त्याने निवडणुकीत मतदान देखील केले आहे. त्याच्या या दाव्यानंतर सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात येत आहे.

अटारी  : केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिजा रद्द केले. पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात जाण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार हजारोच्या संख्येने पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील अटारी बोर्डरच्या मार्गे पाकिस्तानमध्ये जात आहे. पाकिस्तानला निघालेल्या ओसामा या तरुणाने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना आपण भारतात 17 वर्षांपासून राहत असल्याचे तसेच निवडणुकीत मतदान केल्याचे देखील सांगितले.

ओसामा म्हणाला, माझी सरकारला विनंती आहे की आम्हाला थोडा वेळ द्यावा. मी इथलाच नागरिक आहे. गेल्या 17 वर्षांपासून येथे राहतोय. माझे रेशन कार्ड आहे, आधारकार्ड, मतदानकार्ड, डोमासाईल इथलेच आहे. पहलगाममध्ये जे घडले ताचा निषेध करतो ते खूप लज्जास्पद कृत्य होते. धर्माच्या वर माणुसकी असते माणुकीसच्या नातेना या घटनेचा कोणीही निषेधच करेल

तिकडे भविष्य नाही

ओसामा याने सांगितले की, तो 2008 मध्ये भारतात आला. त्याचे दहावी आणि बारावीचे शिक्षण येथेच झाले. आत्ता कम्युटर सायन्समधून डिग्री घेत होता. परीक्षेची तयारी सुरू होती. त्यानंतर मुलाखतीची तयारी करणार होता. अचानक परत पाकिस्तानला परत जाण्याची वेळ आपल्यावर आल्याने काहीच सुचत नसल्याचे त्याने सांगितले तसेच तिकडे (पाकिस्तान) आपले काही भविष्य नसल्याचे देखील त्याने सांगितले.

ओसामाकडे कागदपत्र कशी आली?

ओसामाने दावा केली की त्याच्याकडे मतदानकार्ड,आधारकार्ड, रेशनकार्ड आहे. त्याने निवडणुकीत मतदान देखील केले आहे. त्याच्या या दाव्यानंतर सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात येत आहे. पाकिस्तानी नागरिक भारतात येतो आणि 17 वर्ष राहतो. येथील कागदपत्रे बनवतो तरी सरकारला कळत नाही, अशी टीका नेटीझन्सने केली आहे.

पाकिस्तानला युद्धाची भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेत लष्कराला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले. मोदी या निर्णयानंतर पाकिस्तानचे सुचना आणि प्रचारण मंत्र्याने जाहीर निवेदन करत भारत पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचे म्हटले आहे. मोदींची बैठक झाल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तानी मंत्र्याने निवेदन जारी केले होते.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News