प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पित असाल तर आजच सावध व्हा! जाणून घ्या परिणाम…

तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी सतत पीत असाल तर काळजी घ्या, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिण्याचे काय धोके आहेत ते जाणून घेऊया…

उन्हाळ्यात, लोक नेहमीच पाण्याची बाटली सोबत ठेवतात कारण या ऋतूमध्ये स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा बाटल्यांचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोक प्लास्टिकच्या बाटल्या वापरताना दिसतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जाणून घ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याचे हानिकारक परिणाम…

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. प्लास्टिकमध्ये असलेले रसायन पाण्यात मिसळून शरीरात प्रवेश करतात आणि विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. 

स्तनाच्या कर्करोगाचा धोका 

प्लास्टिकच्या बाटल्या उन्हात किंवा गरम ठिकाणी ठेवल्यास, रसायने अधिक प्रमाणात पाण्यात विरघळू लागतात. त्यामुळे गरम बाटल्यांमधून पाणी पिणे अधिक धोकादायक असू शकते. प्लास्टिकमध्ये अनेकदा (BPA) नावाचे रसायन वापरले जाते, जे गरम झाल्यावर पाण्यात मिसळून शरीरात प्रवेश करू शकते. तसेच, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये इतरही काही हानिकारक रसायने असू शकतात, जी स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. जेव्हा प्लास्टिकची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती डायऑक्सिन नावाचे रसायन सोडते. या रसायनामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.

बीपीए (BPA) आणि इतर रसायने

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये असलेले बीपीए (BPA) आणि इतर रसायने पाण्यामध्ये मिसळून शरीरात प्रवेश करतात आणि अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. ही रसायने शरीरातील हॉर्मोन्सचा समतोल बिघडवतात, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याने कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News